नवी दिल्ली - केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे कर्नाटकमधील दिग्गज नेते अनंत कुमार यांचे आज निधन झाले. त्यांच्या अकाली जाण्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळ आणि भाजपाची मोठी हानी झाली असून, अनंत कुमार यांच्या रूपात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गेल्या साडे चार वर्षांतील कार्यकाळामध्ये मंत्रिमंडळातील तिसऱ्या सहकाऱ्याला गमवावे लागले आहे. अनंतकुमार यांच्या आधी मोदींच्या मंत्रिमंडळातील अन्य दोन सदस्यांचेही अकाली निधन झाले होते. 2014 साली भाजपाला केंद्रात सत्ता मिळून मंत्रिमंडळाचा शपथविधी उरकल्यानंतर काही दिवसांतच महाराष्ट्रीत ज्येष्ठ नेते आणि मोदींच्या मंत्रिमंडळातील मंत्री गोपिनाथ मुंडे यांचे अपघाती निधन झाले. मोदींच्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे ग्रामविकास आणि पंचायती राज विभागाचा कार्यभार सोपवण्यात आला होता. मात्र अकाली निधनामुळे सर्वात कमी काळ मंत्रिपदी राहणाऱ्या मंत्र्यांमध्ये त्यांच्या नावाची नोंद झाली.
साडेचार वर्षांत मोदींनी गमावला मंत्रिमंडळातील तिसरा सहकारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2018 11:45 IST