नवी दिल्ली : परदेश दौऱ्यावर असताना इंधन भरण्यासाठी विमान दीर्घकाळ एखाद्या ठिकाणी थांबवावे लागते तेव्हा पंतप्रधाननरेंद्र मोदी कधीही हॉटेलमध्ये विश्रांतीसाठी जात नाहीत. ते विमानतळावरच स्नान वगैरे उरकून लगेच पुढच्या प्रवासाला रवाना होतात, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत सांगितले.एसपीजी दुरुस्ती विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना शहा म्हणाले की, पूर्वी इंधन भरण्यासह अन्य तांत्रिक कारणांसाठी विमान एखाद्या विमानतळावर रात्रीसाठी थांबायचे, तेव्हा पंतप्रधान मुक्कामासाठी हॉटेलात जायचे; पण नरेंद्र मोदी यांनी विमानाच्या थांब्याच्या वेळी एकदाही हॉटेलात जाऊन विश्रांती घेतली नाही. परदेश दौºयात नेहमीपेक्षा २० टक्के कमी कर्मचारी सोबत नेण्यास सुरुवात करून मोदी यांनी नवा पायंडाही पाडला आहे. परदेश दौºयावर पंतप्रधानांसोबत जाणाºया कर्मचाऱ्यांसाठी बसची व्यवस्था करावी, असेही निदेश मोदी यांनी दिले.
हॉटेलात न जाता मोदी विमानतळावरच स्नान करतात, गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2019 04:45 IST