बलात्कारप्रकरणी नारायण साईवर आरोप निश्चित

By Admin | Updated: August 18, 2015 21:37 IST2015-08-18T21:37:03+5:302015-08-18T21:37:03+5:30

सुरत: स्थानिक न्यायालयाने स्वयंभु आध्यात्मिक गुरू आसारामबापूचा मुलगा नारायण साई आणि त्याच्या नऊ साथीदारांविरुद्ध मंगळवारी एका बलात्कारप्रकरणी आरोप निश्चित केले.

Narayan Sai charges against rape accused | बलात्कारप्रकरणी नारायण साईवर आरोप निश्चित

बलात्कारप्रकरणी नारायण साईवर आरोप निश्चित

रत: स्थानिक न्यायालयाने स्वयंभु आध्यात्मिक गुरू आसारामबापूचा मुलगा नारायण साई आणि त्याच्या नऊ साथीदारांविरुद्ध मंगळवारी एका बलात्कारप्रकरणी आरोप निश्चित केले.
अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एच.एस.मुलिया यांनी साई व त्याच्या साथीदारांविरुद्ध बलात्कार,अनैसर्गिक संबंध, छेडखानी, ओलीस ठेवणे, धमकी आणि गुन्हेगारी कटकारस्थानाशी संबंधित भांदविच्या कलमान्वये आरोप निश्चित केले असून पुढील सुनावणी १ सप्टेंबरला होईल. नारायण साई डिसेंबर २०१३ पासून कारागृहात आहे.
४३ वर्षीय साईला २००२ ते २००५ या कालावधीत त्याच्या आश्रमात थांबलेल्या एका महिलेवर लैंगिक अत्याचाराच्या आरोपात अटक करण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Narayan Sai charges against rape accused