शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
3
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
4
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
5
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
6
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
7
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
8
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
9
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
10
VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
11
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
12
‘आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण…’, काँग्रेसची बोचरी टीका  
13
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
14
फायद्याची गोष्ट! स्टील, अ‍ॅल्युमिनियम की लोखंड... स्वयंपाकासाठी कोणतं भांडं सर्वात बेस्ट?
15
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
16
"आई माझ्या आयुष्यातली क्रिटिक...", शंतनू मोघेची प्रतिक्रिया, प्रियाच्या निधनानंतर मालिकेत कमबॅक
17
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
18
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश
19
Navratri 2025: अष्टमी-नवमीला 'या' दिशेला दिवा लावा; अखंड दिवा लावण्याचे लाभ मिळतील 
20
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली

Narayan Rane : संवैधानिक इतिहासातील दु:खद दिवस, राणेंच्या अटकेवर स्मृती इराणी म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 21:11 IST

स्मृती इराणी यांनी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर भाष्य करताना, महाराष्ट्रात राजकीय विकृतीकरण पाहायला मिळाल्याचं म्हटलं आहे.

ठळक मुद्देस्मृती इराणी यांनी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर भाष्य करताना, महाराष्ट्रात राजकीय विकृतीकरण पाहायला मिळाल्याचं म्हटलं आहे. 'महाराष्ट्रात जे काही घडले ते सर्व नियमांच्या विरोधात आहे, केवळ प्रोटोकॉलच्या, सभ्यतेच्याच नव्हे तर कायद्याच्याही.

नवी दिल्ली - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. राणे यांच्याविरोधात शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतला. राणेंना अटक करण्याची मागणी शिवसैनिकांनी केली आहे. नाशिकमध्ये याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी राणेंना अटकही केली. राणेंच्या अटकेनंतर पुन्हा भाजपा-शिवसेना वाद टोकाला गेला आहे. दोन्ही पक्षाचे नेते आणि प्रवक्ते एकमेकांवर आरोप करत आहेत. आता, केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांनीही आजचा दिवस घटनात्मक इतिहासातील दु:खद दिवस असल्याचं म्हटलंय. 

स्मृती इराणी यांनी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर भाष्य करताना, महाराष्ट्रात राजकीय विकृतीकरण पाहायला मिळाल्याचं म्हटलं आहे. 'महाराष्ट्रात जे काही घडले ते सर्व नियमांच्या विरोधात आहे, केवळ प्रोटोकॉलच्या, सभ्यतेच्याच नव्हे तर कायद्याच्याही. हीच खोली आहे, ज्यात महाराष्ट्रातील राजकीयदृष्ट्या विकृतपणाचे प्रदर्शन केले जाईल. देशाच्या संवैधानिक इतिहासातील हा एक दुःखद दिवस आहे,' अशा शब्दात केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांनी नारायण राणेंच्या अटकेवर भाष्य केलं आहे.  

आम्ही शेवट करू, शेलार यांचा इशारा

भाजप नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करून तुम्ही सुरुवात केली, आता शेवट आम्ही करू, असा स्पष्ट इशारा भारतीय जनता पक्षाचे नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेला व महाविकास आघाडी सरकारला बारामतीतील शहाजीनगर येथे पत्रकार परिषदेत दिला. महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांच्या एकमेकांविरुद्ध बोललेल्या एक सिनेमा चालेल एवढ्या वादग्रस्त वक्तव्याच्या सीडी आमच्याकडे आहेत, असेही त्यांनी म्हटले. यावेळी भाजप नेते हर्षवर्धन पाटील उपस्थित होते.

भाजपला सत्तेची भूक अन् लालच 

भाजपाने काहीही करुन महाराष्ट्रात सरकार बनविण्याचा प्रयत्न केला. त्यातूनच, देवेंद्र फडणवीस काही तासांसाठी मुख्यमंत्री बनले होते. त्यामुळेच, महाराष्ट्रात लोकांमध्ये आक्रोश आहे, क्रोध आहे. दररोज तिसऱ्यादिवशी हे सांगण्यात येतंय की महाराष्ट्रात ऑपरेशन कमळ होणार आहे. दर तीन दिवसांनी भाजप-शिवसेना सरकार बनविणार असल्याची अफवा पसरविण्यात येत आहे. भाजपला सत्तेची भूख आणि लालच आहे. त्यामुळेच, नारायण राणेंना प्रमुखपद देण्यात आलंय, अशी बोचरी टीका शिवसेनेच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी केली आहे.  

टॅग्स :Smriti Iraniस्मृती इराणीNarayan Raneनारायण राणे Shiv Senaशिवसेना