पोटच्या मुलीवर बलात्कार करणार्‍या नराधम पित्यास जन्मठेप

By Admin | Updated: March 10, 2016 00:26 IST2016-03-10T00:26:15+5:302016-03-10T00:26:15+5:30

जळगाव : जीवे मारण्याची धमकी देत पोटच्या सख्ख्या मुलीवर बलात्कार करणार्‍या समतानगर (जळगाव) येथील नराधम पित्यास बुधवारी प्र.जिल्हा व सत्र न्यायाधीश के.बी. अग्रवाल यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

Naradham Pyaad Jeevan Sheep, who raped the stomach's daughter | पोटच्या मुलीवर बलात्कार करणार्‍या नराधम पित्यास जन्मठेप

पोटच्या मुलीवर बलात्कार करणार्‍या नराधम पित्यास जन्मठेप

गाव : जीवे मारण्याची धमकी देत पोटच्या सख्ख्या मुलीवर बलात्कार करणार्‍या समतानगर (जळगाव) येथील नराधम पित्यास बुधवारी प्र.जिल्हा व सत्र न्यायाधीश के.बी. अग्रवाल यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
समतानगरातील रहिवासी असलेल्या आरोपी पित्याने ५ जानेवारी २०१४ रोजी दुपारी दोन ते अडीच वाजेदरम्यान, राहत्या घरात त्याच्या १४ वर्षीय मुलीवर विळ्याचा धाक दाखवून बलात्कार केला होता. याप्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरून त्याच्याविरुद्ध रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
सात जणांच्या महत्त्वपूर्ण साक्ष
या गुन्‘ाचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक कृष्णा गोपनारायण यांनी करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. हा खटला न्यायाधीश के.बी. अग्रवाल यांच्या न्यायालयात चालला. त्यात पीडित मुलीसह घटनेच्या प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्या महिला, पंच, तपासाधिकारी अशा एकूण सात जणांच्या साक्ष सरकार पक्षातर्फे ॲड.संभाजी जाधव व ॲड.शरद सूर्यवंशी यांनी नोंदवल्या. सरकारी वकिलांचा प्रभावी युक्तिवाद व परिस्थितीजन्य पुरावे लक्षात घेता, न्यायालयाने आरोपी ला पोस्को कलम ६ नुसार दोषी धरत जन्मठेप व दोन हजार रुपये दंड; दंड न भरल्यास २ महिने शिक्षा तसेच भादंवि कलम ५०६ नुसार ३ वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. आरोपीतर्फे ॲड.संतोष चव्हाण यांनी काम पाहिले.

Web Title: Naradham Pyaad Jeevan Sheep, who raped the stomach's daughter