नांदेडमध्ये तरुणीची आत्महत्या

By Admin | Updated: February 8, 2016 02:15 IST2016-02-08T02:15:03+5:302016-02-08T02:15:03+5:30

- एकतर्फी प्रेमातून सुरू होता छळ

Nanded girl committed suicide | नांदेडमध्ये तरुणीची आत्महत्या

नांदेडमध्ये तरुणीची आत्महत्या

-
कतर्फी प्रेमातून सुरू होता छळ
हदगाव (जि. नांदेड) : एकतर्फी प्रेमातून सुरु असलेल्या त्रासाला कंटाळून १८ वर्षीय तरुणीने पेटवून घेतले़ उपचारादरम्यान या तरुणीचा ४ फेब्रुवारीच्या पहाटे मृत्यू झाला़ ही घटना हदगाव तालुक्यातील हरडप येथे घडली.
गावातीलच विशाल विलास शिंदे (२१) याचे प्रतिज्ञा ऊर्फ छकुली संजय जाधव हिच्यावर एकतर्फी प्रेम होते. दुसर्‍याशी लग्न केल्यास आत्महत्या करून तुझ्या कुटुंबियांतील सदस्यांच्या नावांची चिठ्ठी लिहून ठेवतो, अशी धमकी तो देत होता़ प्रतिज्ञाने आपल्या आईबरोबरच विशालच्या आईवडिलांनाही हा सर्व प्रकार सांगितला होता. त्यानंतरही त्याच्या वर्तनात काही फरक पडला नाही़दीड महिन्यांपूर्वी प्रतिज्ञाची सोयरीक झाली़ त्यामुळे चिडलेल्या विशालने अधिक त्रास देणे सुरू केले़ तसेच नियोजित वराच्या घरी फोन करून आपले प्रतिज्ञावर प्रेम असल्याबाबत सांगितले़ एवढ्यावरच न थांबता त्याने त्याला फोनवरू धमकावले देखील.
हे सर्व समजल्यानंतर प्रतिज्ञाने ३१ जानेवारी रोजी आजोळी हरडप येथे स्वत:ला पेटवून घेतले़ यात ती ९५ टक्के भाजली़ नांदेड येथील जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा ४ फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला़ तत्पूर्वी पोलिसांनी घेतलेल्या जबाबात तिने घडलेला घटनाक्रम सांगत या स्थितीस विशाल शिंदे जबाबदार असल्याचे सांगितले़ मात्र पोलिसांनी अद्याप विशालला अटक केली नसल्याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Nanded girl committed suicide