(सामाजिक ऋण सदरासाठी) अपंगासाठी आधार बनलेली नांदणीची संस्था

By Admin | Updated: May 12, 2014 20:56 IST2014-05-12T20:56:43+5:302014-05-12T20:56:43+5:30

Nandani Institute for Disability (for Social Loans) | (सामाजिक ऋण सदरासाठी) अपंगासाठी आधार बनलेली नांदणीची संस्था

(सामाजिक ऋण सदरासाठी) अपंगासाठी आधार बनलेली नांदणीची संस्था

>सामाजिक बांधीलकी जोपासत शिरोळ तालुका व परिसरातील अपंगाना आधार देण्याबरोबरच त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचे कार्य अपंग कल्याण व पुनर्वसन संस्था नांदणी ही संस्था करीत आहे. संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम अपंगांच्यासाठी राबविण्यात येत आहे.
राजेंद्र पाटील-यड्रावकर सोशल फौंडेशन यांच्या सहकार्याने अपंग कल्याण व पुनर्वसन संस्था नांदणी ही गेली पाच वर्षे अपंग, अंध, मतिमंद, कर्णबधिर यांच्यासाठी कार्य करीत आहे.
संस्था स्थापनेनंतर शरद सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी आपल्या कारखान्यामार्फत शिरोळ व हातकणंगले तालुक्यातील अपंग, अंध, मतिमंद, कर्णबधिर, मूकबधिर, लोकांची नावे अपंग संस्थेमध्ये नोंदवून त्यांच्या सहकार्यासाठी सदैव तत्पर असणारी अशी संस्था म्हणून नावारूपास आली आहे.
संस्थेमार्फत केलेली कामे-अपंग कल्याण व पुनर्वसन संस्था नांदणी मार्फत ० ते १८ वर्षांपर्यंतच्या अपंग मुलांचे शिबिर व ऑपरेशन, कॅम्प घेऊन डॉ. सतीश पाटील यांच्यामार्फत मोफत ऑपरेशन करून देण्यात आले. तसेच घोडावत ग्रुपचे विनोद घोडावत व विमलकुमार रुणवाल यांनी ऑपरेशन मोफत करून दिले. भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शांतीलाल मुया यांनी नारायण सेवा संस्था उदयपूर येथे अपंगाचे ऑपरेशन करून दिले.
क्रीडा स्पर्धा-नांदणी येथील गणेश बेकरीचे अध्यक्ष आण्णासाहेब चकोते यांच्यावतीने अंध मुलांच्या क्रीडा स्पर्धा आयोजन करण्यात आले. कोल्हापूर, सांगली, पुणे या ठिकाणाहून स्पर्धकांनी सहभाग घेतला. तसेच गणेश बेकरीमध्ये २५ अपंग व्यक्तींना नोकरीमध्ये सामावून घेतले आहे.
प्रशिक्षण केंद्र-राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या सहकार्याने अपंग कल्याण व पुनर्वसन संस्थेमार्फत अपंगाना स्वावलंबी बनता यावे. तसेच समाजात निर्भीडपणे जगता यावे, यासाठी शासकीय तंत्रनिकेतनच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण केंद्र सुरू केले. यामध्ये अपंगाना व्यवसाय प्रशिक्षण दिले जाते. मेणबत्ती, उदबत्ती, कापूर तयार करणे, रेडिओ, टीव्ही, टेप, सीडीप्लेअर दुरुस्त करणे, मोटार रिवायडिंग करणे, घड्याळ दुरुस्ती करणे, तसेच महिलांसाठी शिवणकाम, ब्युटी पार्लर असे व्यवसाय प्रशिक्षण देण्यात येत आहे.
जयपूर फूट वाटप-उषा मोहिनी विकलांग पुनर्वसन केंद्र, रोटरी क्लब सांगली व देसाई परिवाराच्यावतीने जयपूर फूटसाठी अंपगांच्या तपासणीचा कॅम्प घेऊन ५१ अपंगाना जयपूर फूट वाटपकरण्यात आले.
मतिमंद मुलांना औषध उपचार-मतिमंद मुलांचे आरोग्य तपासणी शिबिराचे मोदी रुग्णालयामध्ये आयोजन करण्यात आले. त्यामध्ये १८ मतिमंद मुले लाभ घेत आहेत. तसेच मतिमंद मुलांच्या पालकांना त्यांच्या संगोपनाविषयी मार्गदर्शन करण्यात येते.
एस.टी.वाहकांचा सत्कार-आपल्या भागामध्ये असणार्‍या अंध, अपंग, मतिमंद, कर्णबधिर, मुकबधिर तसेच अनेक व्याधिग्रस्त लोकांना बसमधून प्रवास करताना अंधाची काठी व अपंगाचे हात-पाय हे वाहकच बनत असतात. त्यामुळे अपंगाना त्याची मोठी मदत होते. त्यांचा संस्थेमार्फत प्रत्येकवर्षी सत्कार करण्यात येतो.
अपंग व्यक्तीसाठी यात्रा-अपंग, अंध, मतिमंद, कर्णबधिर, मूकबधिर लोकांना वर्षातून एकदा तीर्थक्षेत्र दर्शन घडविण्यासाठी गेली पाचवर्षे शिखरजी यात्रेचे आयोजन करण्यात येते. २०१३ मध्ये ३५० अपंग बांधवांना मोफत शिखरजी यात्रा घडविली. तर चालूवर्षी १७० अपंगांनी यात्रा केली आहे.
अपंग संस्थेमध्ये शिरोळ, हातकणंगले, सांगली, कर्नाटक, शाहूवाडी, पन्हाळा, राधानगरी येथून अपंग येतात. त्यांना जयपूर फूट, क्रीडा स्पर्धा, तीनचाकी सायकल, व्हिल चेअर, कर्ज प्रकरण यासाठी येत असत. त्यांना संस्थेच्यावतीने वस्तूंचे वाटप केले जाते. यासाठी संस्थेचे अध्यक्ष सतीश जांगडे, उपाध्यक्ष-दीपक पाटील, सचिव-विद्यासागर पाटील, संचालक-महावीर ऐनापुरे, भारती पाटील, धोंडुताई कांबळे, प्रमोद माळी, आदी सतत प्रयत्नशील असतात.
- संदीप बावचे, जयसिंगपूर
फोटो - १२०५२०१४-जेएवाय-०२,०३
फोटो ओळी - ०२) अपंग व पुनर्वसन संस्थेच्यावतीने अपगांना जयपूर फूटचे वाटप करण्यात येते.
०३) अपगांना स्वावलंबी बनता यावे यासाठी शासकीय तंत्रनिकेतन व्यवसाय प्रशिक्षणाअंतर्गत मेणबत्ती तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात येते.

Web Title: Nandani Institute for Disability (for Social Loans)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.