गुजरात दंगलप्रकरणी मोदींना नानावटी आयोगाची क्लीन चीट
By Admin | Updated: November 19, 2014 17:54 IST2014-11-19T17:54:29+5:302014-11-19T17:54:29+5:30
गुजरातमध्ये २००२ मध्ये झालेल्या जातीय दंगलीप्रकरणी गुजरातचे माजी मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना नानावटी आयोगाकडून क्लीन चीट मिळाल्याचे वृत्त आहे.

गुजरात दंगलप्रकरणी मोदींना नानावटी आयोगाची क्लीन चीट
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १९ - गुजरातमध्ये २००२ मध्ये झालेल्या जातीय दंगलीप्रकरणी गुजरातचे माजी मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना नानावटी आयोगाकडून क्लीन चीट मिळाल्याचे वृत्त आहे.
निवृत्त न्यायाधीश जी.टी.नानावटी आयोगाने मंगळवारी दंगलप्रकरणी आपला अहवाल गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्याकडे सोपवला होता. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश नानावटी आणि गुजरात हायकोर्टाचे निवृत्त न्यायाधीश अक्षय मेहता यांच्या दोन सदस्य असलेल्या आयोगाने दंगलीप्रकरणी अहवाल तयार केला आहे. मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना समन्स पाठवण्याचे कोणतेही कारण नसल्यानेच त्यांना समन्स पाठविण्यात आले नसल्याची माहिती नानावटी यांनी दिली. तब्बल १२ वर्षानंतर याप्रकरणी अहवाल आला असून ६ मार्च २००२ रोजी मोदी सरकारने दंगल प्रकरणाचा तपास करण्यासाठी नानावटी आयोग स्थापन केला होता. गुजरात दंगलीवरून नरेंद्र मोदी यांच्यावर चौफेर टीका करण्यात आली आहे. परंतू नानावटी आयोगाने क्लीन चीट दिल्याने नरेंद्र मोदी यांना मोठा दिलासा मिळाला आहे.