शहरं
Join us  
Trending Stories
1
पडळकर-आव्हाड समर्थक राडा प्रकरणी अहवाल सादर; "'त्या' कार्यकर्त्यांना २ दिवस कारावास अन्..."
2
“श्रमलेल्या बापासाठी लेक...”; शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त सुप्रिया सुळेंची खास पोस्ट
3
रुपयाचा ऐतिहासिक नीचांक! डॉलरच्या तुलनेत दर ९०.५६ रुपये; घसरण्याची ३ मोठी कारणे समोर
4
एकाच रिचार्जमध्ये मिळणार वाय-फाय, फोन आणि डीटीएच, हा प्लान खूप खास
5
Video - "तुला लाज वाटली नाही?"; नवऱ्याने बायकोला बॉयफ्रेंडसोबत OYO मध्ये रंगेहाथ पकडलं अन्...
6
मुलानं आईला मारलं, मग स्वतःलाही संपवलं; ChatGPT कारणीभूत? OpenAI वर खटला!
7
Kankavli: हरवलेल्या मोबाईलमुळे ‘त्या’ प्रेमी युगुलानं संपवलं जीवन, तपासातून धक्कादायक माहिती समोर   
8
आश्चर्यकारक! Tata च्या नवीन Sierra ने दिले 30 kmpl चे मायलेज; 222 kmph चा टॉप स्पीडही गाठला
9
हिरा निघाला 'हा' शेअर; ९० टक्के फायद्यावर लिस्टिंग, IPO मध्ये लागलेली फक्त २ पट बोली
10
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, सोनं 1.34 लाख पार तर चांदी 2 लाखांच्या उंबरठ्यावर; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
11
मॅक्सिको भारतावर नाही तर आपल्याच प्रगतीवर टाळं लावतोय, फेडावी लागेल मोठी किंमत
12
कोथरुडमध्ये मिळू लागले अवघ्या ८६ रुपयांना लीटर पेट्रोल; वाहनचालकांची उडाली झुंबड...
13
China Condom Tax: चीनमध्ये कंडोमवर भरपूर टॅक्स लादणार, जिनपिंग यांच्या धोरणाला विरोध का होतोय?
14
प. बंगालमध्ये आता बांधले जाणार राम मंदिर; भाजपा नेत्यांनी लावले पोस्टर, देणगी देण्याचे आवाहन
15
विनेश फोगाटचा यू-टर्न! पुन्हा कुस्तीच्या आखाड्यात परतणार, निवृत्तीचा निर्णय रद्द, कारण...
16
इंस्टाग्रामच्या कंटाळवाण्या रील्सला म्हणा 'बाय बाय'! फक्त एका सेटिंगने बदला फीडचा अल्गोरिदम
17
‘स्लीपर वंदे भारत’वर मोठी अपडेट! १ हजार किमी अंतर ८ तासात, १६० प्रति तास वेग; पहिली सेवा...
18
भारतात येत असताना...! विनफास्ट अमेरिकेत डीलरशीप बंद करू लागली; संख्या दोन डझनांखाली आली...
19
व्हेनेजुएला-अमेरिका वादात रशियाची उडी; मादुरोंच्या मदतीला पुतिन धावले, ट्रम्पना धक्का...
20
'जुम्मा गर्ल' किमी काटकर आठवतेय का? लेटेस्ट फोटो आला समोर, ओळखणं झालंय कठीण
Daily Top 2Weekly Top 5

सांत्वनासाठी नाना सुशांतच्या कुटुंबाला भेटले; बॉलिवूडमधील गटबाजीवर स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2020 13:42 IST

सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी नाना पाटेकर पाटण्यात

पाटणा: अभिनेते नाना पाटेकर यांनी सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांनी सुशांतच्या पाटण्यातील घरी जाऊन त्याच्या कुटुंबीयांचं सांत्वन केलं. सुशांतच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून नानांनी श्रद्धांजली वाहिली. यानंतर त्याच्या कुटुंबीयांची विचारपूस केली. जवळपास अर्धा तास नाना पाटेकर सुशांतच्या कुटुंबीयांसोबत होते. सुशांतच्या कुटुंबीयांच्या भेटीसाठी आलेल्या नाना पाटेकर यांनी सीआरपीएफच्या ४७ व्या बटालियनच्या कॅम्पसलादेखील भेट दिली. त्यावेळी त्यांनी सुशांतच्या आत्महत्येबद्दल दु:ख व्यक्त केलं. 'सुशांत सिंह अतिशय अद्भुत कलाकार होता. तो खूप सुंदर अभिनय करायचा. तो आता या जगात नाही, यावर विश्वासच बसत नाही. मी माझा मुलगा गमावल्यासारखं वाटतंय. सुशांत आता आपल्यात नाही, हे सत्य अजूनही मला पचवता येत नाही. सुशांत लहान होता. अजून ३० वर्षे तो काम करू शकत होता. सुशांतसारखी मुलं फार कमी असतात,' अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.सुशांतचं यश प्रस्थापितांना खुपत असल्यानं त्याला एकटं पाडण्याचे, त्याला चित्रपट मिळू नये यासाठी प्रयत्न करण्याचे आरोप झाले. त्यावरही नानांनी भाष्य केलं. 'बॉलिवूडसाठी मीदेखील आऊटसाईडर होतो. मात्र मी माझं स्थान निर्माण केलं. मला राग येतो. मी चिडतो. मात्र असं असूनही बॉलिवूडनं मला स्वीकारलं,' असं नाना म्हणाले.बॉलिवूडमध्ये मोठ्या प्रमाणात गटबाजी होत असल्याचा मुद्दादेखील सुशांतच्या आत्महत्येनंतर चर्चेत आला. त्यावर नानांनी अगदी स्पष्टपणे भाष्य केलं. 'मी कधीच इंडस्ट्रीत अव्वल नव्हतो. आताची परिस्थिती तर आणखी बदलली आहे. मी कोणत्याही पार्टीला जात नाही. मला तोंडावर बोलण्याची सवय आहे. बॉलिवूडमध्ये गटबाजी आहे. मात्र तुमच्याकडे कौशल्य असल्यास तुम्ही तुमचं स्थान निर्माण करू शकता. कोणी कितीही गटबाजी केली, तरी तुम्ही चांगलं काम करत राहू शकता,' असं नाना म्हणाले. सुशांत सिंह राजपूतनं १४ जूनला त्याच्या मुंबईतल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील घराणेशाही, कंपूशाहीवर टीका होत आहे. त्यामुळेच अनेक बड्या कलाकारांनी सुशांतच्या कुटुंबीयांशी संवाद साधलेला नाही. अशा परिस्थितीत नाना पाटेकरांनी काल सुशांतच्या कुटुंबीयांची पाटण्यात भेट घेतली. त्यांनी सुशांतच्या कुटुंबासोबत संवाद साधत त्यांना धीर दिला. ताणतणावामुळे नैराश्य आल्यानं सुशांतनं आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सध्या या प्रकरणात पोलीस अनेकांची चौकशी करत आहेत. त्यात काही प्रॉडक्शन हाऊसेसचादेखील समावेश आहे. याबद्दल माध्यमांनी नाना पाटेकर यांच्यासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यावर भाष्य करणं टाळलं.मला माझाच मुलगा गमावल्यासारखं वाटतंय; सुशांतच्या मृत्यूबद्दल नानांकडून दु:ख व्यक्तVideo: तेव्हा मला सुशांतमध्ये आत्मविश्वास दिसला नव्हता, शोएब अख्तरने सांगितली आठवण

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतNana Patekarनाना पाटेकर