शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

नमो अ‍ॅपमुळे भाजपामध्ये घाबरगुंडी; अनेक खासदारांची उडणार दांडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2019 10:48 IST

उमेदवारी देताना नमो अ‍ॅपवरील डेटाचा आधार घेतला जाणार

नवी दिल्ली: नमो अ‍ॅपमुळे केल्या जात असलेल्या सर्वेक्षणामुळे भाजपाच्या अनेक खासदारांची झोप उडाली आहे. मोदींनी नमो अ‍ॅपच्या माध्यमातून लोकसभा मतदारसंघातील तीन प्रमुख नेत्यांची नावं सुचवण्याचं आवाहन केलं आहे. यासाठी नमो अ‍ॅपवर 'पीपल्स पल्स' नावानं सर्वेक्षण सुरू करण्यात आलं आहे. लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट देताना या माहितीचा आधार पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार आहेत. त्यामुळे अनेक खासदार सध्या चिंतेत आहेत. केंद्र सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या योजना लोकांपर्यत पोहोचवा, अशा सूचना मोदींनी अनेकदा खासदारांना दिल्या आहेत. याशिवाय सरकारी आकडेवारीच्या मदतीनं नमो अ‍ॅपवर सक्रीय राहण्याच्या सूचनादेखील खासदारांना वारंवार देण्यात आल्या आहेत. नमो अ‍ॅपवरील एक प्रश्न खासदारांना अस्वस्थ करतो आहे. तुमच्या लोकसभा मतदारसंघातील तीन लोकप्रिय नेते कोणते, या प्रश्नानं भाजपाच्या खासदारांची झोप उडाली आहे. उमेदवारी देताना नमो अ‍ॅपवरील हा प्रश्न महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.अधिकाधिक लोकांनी नमो अ‍ॅपवरील सर्वेक्षणात सहभागी व्हावं, असं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं आहे. यासाठी मोदींनी एक व्हिडीओ ट्विट केला होता. 'तुमचा अभिप्राय, तुमच्या प्रतिक्रिया महत्त्वाच्या आहेत. तुम्ही दिलेल्या अभिप्रियांमुळे अनेक निर्णय घेताना आम्हाला मदत होईल,' असं आवाहन मोदींनी व्हिडीओच्या माध्यमातून केलं होतं. भाजपा अध्यक्ष अमित शहांनीही ट्विटरच्या माध्यमातून अशाच प्रकारचं आवाहन केलं होतं. तुमच्या मतदारसंघातील मुद्दे थेट पंतप्रधानांपर्यंत पोहोचवा, असं शहांनी म्हटलं होतं. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९BJPभाजपाMember of parliamentखासदार