अलिबागच्या माजी नगराध्यक्षा नमिता नाईक यांचे निधन

By Admin | Updated: July 19, 2015 21:24 IST2015-07-19T21:24:27+5:302015-07-19T21:24:27+5:30

१६ दिवसांची मृत्यूशी झुंज : अलिबागकरांवर शोककळा

Namita Naik, former city bearer of Alibaug, passed away | अलिबागच्या माजी नगराध्यक्षा नमिता नाईक यांचे निधन

अलिबागच्या माजी नगराध्यक्षा नमिता नाईक यांचे निधन

दिवसांची मृत्यूशी झुंज : अलिबागकरांवर शोककळा
अलिबाग : अलिबागच्या माजी नगराध्यक्षा तथा विद्यमान नगरसेविका नमिता प्रशांत नाईक (४१) यांचे शनिवारी पुण्यात उपचारांदरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात पती विद्यमान नगराध्यक्ष प्रशांत नाईक, मुलगी अदिती, अक्षया आणि सासू सुनिता नाईक असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने अलिबागमध्ये शोककळा पसरली आहे.
पुणे येथे नमिता नाईक यांच्या गाडीला २ जुलै रोजी अपघात झाला होता. यात ब्रेन हॅमरेज झाल्याने त्यांच्यावर रुबी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या मेंदूवर दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. शनिवारी रक्तदाब वाढल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक झाली. डॉक्टरांनी दुपारी त्यांना मृत घोषित केले.
कायद्याचे शिक्षण घेतलेल्या नमिता नाईक २००६ सालापासून राजकारणात सक्रिय होत्या. नगरसेवक ते नगराध्यक्ष पदापर्यंत त्यांनी मजल मारली. तब्बल अडीच वर्षे त्या नगराध्यक्षपदी विराजमान होत्या, त्याचप्रमाणे त्यांनी महिला व बालकल्याण विभागाच्या सभापतीपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली होती.
नमिता नाईक यांच्या निधनाचे वृत्त समजताच अलिबाग येथील शेतकरी भवन परिसरात शेकडो कार्यकर्त्यांनी गर्दी करायला सुरुवात केली होती. शेतकरी भवनमध्ये शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील, आरडीसी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक यांच्यासह शेकापचे पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो - 18 नमिता नाईक
..............

Web Title: Namita Naik, former city bearer of Alibaug, passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.