9 दिवसात बदललं योगींचं नाव, मुख्यमंत्री निवासाबाहेर नवी पाटी

By Admin | Updated: March 28, 2017 16:55 IST2017-03-28T16:31:26+5:302017-03-28T16:55:21+5:30

उत्तर प्रदेशच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेरील नावाची पाटी पुन्हा बदलवण्यात आली आहे.

The name of the Yogi changed in 9 days, the new party outside the Chief Minister's residence | 9 दिवसात बदललं योगींचं नाव, मुख्यमंत्री निवासाबाहेर नवी पाटी

9 दिवसात बदललं योगींचं नाव, मुख्यमंत्री निवासाबाहेर नवी पाटी

>ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 28 - उत्तर प्रदेशच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेरील नावाची पाटी पुन्हा बदलवण्यात आली आहे. पाटीवरील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं नाव दुरूस्त कऱण्यात आलं आहे. आधी या पाटीवर आदित्यनाथ योगी असं लिहीलं होतं आता यामध्ये बदल करून योगी आदित्यनाथ असं लिहीण्यात आलं आहे. 
 
अनेकदा बदललं नाव-
योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाल्यावर कालीदास मार्ग 5 वरील मुख्यमंत्री निवासाबाहेर  योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री यानावाने पाटी लावण्यात आली होती. त्यानंतर ती पाटी बदलवून आदित्यनाथ योगी अशी पाटी लावण्यात आली. त्यानंतर 9 दिवसांमध्ये पुन्हा एकदा पाटी बदलून योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री अशी पाटी लावण्यात आली आहे. 
 
योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्यावेळी आदित्यनाथ योगी या नावाने शपथ घेतली होती. तेव्हापासून त्यांच्या नावात फेरफार करण्यात येत आहे.  

Web Title: The name of the Yogi changed in 9 days, the new party outside the Chief Minister's residence