नायडू म्हणाले, मला संघ परिवाराचा अभिमान आहे
By Admin | Updated: December 23, 2014 00:51 IST2014-12-23T00:51:46+5:302014-12-23T00:51:46+5:30
कथित बळजबरीच्या धर्मांतर मुद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवेदन करावे, या विरोधकांच्या मागणीदरम्यान सोमवारी लोकसभेत

नायडू म्हणाले, मला संघ परिवाराचा अभिमान आहे
नवी दिल्ली : कथित बळजबरीच्या धर्मांतर मुद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवेदन करावे, या विरोधकांच्या मागणीदरम्यान सोमवारी लोकसभेत सत्ताधारी भाजपा आणि विरोधी पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले़ तुम्हाला गांधी घराण्याचा अभिमान आहे, मला संघ परिवाराचा अभिमान आहे, असे संसदीय कामकाज मंत्री एम़ वेंकय्या नायडू काँग्रेसला उद्देशून म्हणाले. धर्मांतराशी सरकार वा भाजपाचे काहीही देणे-घेणे नाही, अशी स्पष्टोक्तीही नायडूंनी यावेळी दिली़ पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही यावेळी उपस्थित होते़
काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी धर्मांतराच्या घटनांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघांशी संबंधित संघटनांचा सहभाग असल्याचा आरोप केला़ संघ परिवाराच्या मुशीतून घडल्याचा आपल्याला अभिमान असल्याचे नायडू आधीच सांगून चुकले आहेत, अशी उपरोधिक टीका खर्गेंनी केली़ यावर नायडूंनी लगेच प्रत्युत्तर दिले, असे सांगण्यात गैर काय? तुम्हाला गांधी घराण्याचा अभिमान आहे़, तर मला संघ परिवाराचा गर्व आहे.
पीएमकेचा हल्ला
चेन्नई : रालोआ सरकारचा घटक पक्ष असलेल्या पीएमकेने धर्मांतर मुद्यावर भाजपाला लक्ष्य केले़ जनतेने हिंदू राष्ट्र बनवण्यासाठी नाही तर विकासाचे स्वप्न पाहून सत्ता सोपवली आहे़ अशास्थितीत केंद्र सरकारने स्वत:चा अजेंडा राबविण्याऐवजी सामान्यांच्या हिताच्या मुद्यांना हात घालायला पाहिजे, असे पीएमकेचे संस्थापक एस़ रामदास म्हणाले़
(लोकमत न्यूज नेटवर्क)