शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नाहरगड किल्ला मृत्यू प्रकरण - तरुणाचे 'सेल्फी फोटो' तपासात ठरणार महत्वपूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2017 13:20 IST

जयपूरच्या नाहरगड किल्ल्यातील मृत्यू प्रकरणाच्या तपासात मोबाइल फोन महत्वपूर्ण ठरणार आहे.

ठळक मुद्देताने ऑनलाइन व्हिडिओ अपलोड केला होता का ? त्याची सुद्धा पोलिसांनी माहिती मागितली आहे. धक्कादायक म्हणजे मृतदेहाशेजारी भिंतीवर 'आम्ही केवळ पुतळे जाळत नाही, तर लटकवतोही' असं कोळशाने लिहिलं होतं.

जयपूर - जयपूरच्या नाहरगड किल्ल्यातील मृत्यू प्रकरणाच्या तपासात मोबाइल फोन महत्वपूर्ण ठरणार आहे. शुक्रवारी जयपूरच्या नाहरगड किल्ल्यातील भिंतीवर चेतन सैनी या तरुणाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडला होता. मृत्यूपूर्वी चेतनने त्याच्या मोबाईल फोनमधून काही सेल्फी फोटो काढले होते. हे फोटो या रहस्यमयी मृत्यू प्रकरणाच्या तपासात महत्वपूर्ण ठरतील असा पोलिसांचा कयास आहे. 

पोलिसांनी  पुढील तपासासाठी न्याय वैद्यकीय प्रयोगशाळेकडे हा मोबाईल दिल आहे. मृताने ऑनलाइन व्हिडिओ अपलोड केला होता का ? त्याची सुद्धा माहिती पोलिसांनी मागितली आहे. सध्या पद्मावती चित्रपटावरुन राजस्थानात मोठा वाद सुरु आहे. या मृत्यूला पद्मावती चित्रपटाच्या वादाशी जोडले जात आहे. 

धक्कादायक म्हणजे मृतदेहाशेजारी भिंतीवर 'आम्ही केवळ पुतळे जाळत नाही, तर लटकवतोही' असं कोळशाने लिहिलं होतं. चेतन सैनी गुरुवारी दुपारी 3.30 वाजता घरातून बाहेर पडल्यानंतर घरी परतलाच नाही. शुक्रवारी सकाळी स्थानिक नागरिकांनी नाहरगड किल्ल्याच्या भिंतीवर त्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत पाहिला व तात्काळ पोलिसांना माहिती दिली. 

पोलिसांना मृतदेह तपासत असताना पँटच्या एका खिशात मोबाईल फोन आणि पाकिट सापडले. मोबाईल ओपन केल्यानंतर त्यामध्ये मृताने काही सेल्फी फोटो काढल्याचे दिसले अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रफुल्ल कुमार यांनी दिली.  मृतदेहाशेजारी चेतन तांत्रिकचं नाव भिंतीवर लिहिलेलं होतं. असं म्हटलं जातं की, चेतन तांत्रिक राजा रतन सिंहच्या दरबारात होता आणि तिथून हाकलल्यानंतर तो अल्लाऊद्दीन खिलजीला जाऊन भेटला. त्यानेच खिलजीला पद्मावतीबाबत सांगितलं होतं. 

राजपूत करणी सेनेचे महिपाल सिंह यांनी मात्र या घटनेशी आपल्या संघटनेचा काहीही संबंध नसल्याचा दावा केला आहे. 'आंदोलन करण्याची ही आमची पद्धत नाही. अशाप्रकारच्या आंदोलनाला लोकांनीही पाठिंबा देऊ नये', असं महिपाल सिंह बोलले आहेत.  

करणी सेनेची थिएटर्स जाळण्याची धमकीभारतात 'पद्मावती' चित्रपट प्रदर्शित करण्यावरुन वाद सुरु असला, तरी ‘द ब्रिटिश बोर्ड ऑफ फिल्म क्लासिफिकेशन’ने (बीबीएफसी) पद्मावती चित्रपटाच्या प्रदर्शनाला परवानगी दिली आहे. दरम्यान चित्रपटाला सुरुवातीपासूनच विरोध करणा-या करणी सेनेने युकेमधील थिएटर्स जाळण्याची धमकी दिली आहे. 'पद्मावती' चित्रपट वादाच्या भोव-यात सापडल्यामुळे भारतात या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलावी लागली आहे. पण इंग्लंडमध्ये हा चित्रपट येत्या 1 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. 

‘बीबीएफसी’ने चित्रपटातील एकाही दृश्याला कात्री न लावता ‘१२ ए’ रेटिंग दिली आहे. या प्रमाणपत्रामध्ये चित्रपटाच्या सारांशात ‘पद्मावती’ हा हिंदी भाषिक चित्रपट असून, राजपूत राणीला मिळवण्यासाठी एक सुलतान त्यांच्या राज्यावर कशाप्रकारे आक्रमण करतो याचे ऐतिहासिक कथानक यात असल्याचे लिहिले आहे. दरम्यान करणी सेनेचे नेता सुखदेव सिंग यांनी युकेमध्ये ज्या चित्रपटगृहांमध्ये पद्मावती दाखवण्यात येईल, ती सर्व चित्रपटगृह जाळण्याची धमकी दिली आहे. 

टॅग्स :Crimeगुन्हाPadmavatiपद्मावती