शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसही म्हणाले,"लाव रे तो व्हिडिओ"; ठाकरे बंधू एकमेकांबद्दल काय बोलले होते तेच ऐकवले...
2
"मराठी माणूस खतरे में है, मग ३० वर्ष तुम्ही..." फडणवीस यांचा ठाकरेंवर निशाणा
3
BMC Elections 2026 : "काहींना निवडणुका आल्या की, मराठी माणूस दिसतो, इतरवेळी नेटफ्लिक्स..." एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
4
अर्ज मागे घेण्यासाठी कोट्यवधीची ऑफर, 'त्या' उमेदवारांना स्टेजवरच बोलावले; राज ठाकरेंचा घणाघात
5
केजी टू पीजी मोफत शिक्षण, मराठी आणि हिंदी भाषा सक्तीची असेल; नवी मुंबईत भाजपाचा जाहीरनामा
6
WPL मध्ये २४ तासांच्या आत विक्रमाची पुनरावृत्ती! ग्रेसनं केली सोफीची बरोबरी; त्यातही कमालीचा योगायोग
7
धक्कादायक! OTP किंवा लिंक नाही, आता तुमचा आवाज बँक खाते रिकामे करणार, बोलणे पडणार महागात
8
'आम्हाला युद्ध नको, पण...', ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणचे प्रत्युत्तर, खामेनेई आर-पारच्या मूडमध्ये
9
WPL 2026 : आरसीबीच्या ताफ्यातील ब्युटीनं एका ओव्हरमध्ये २ विकेट्स घेत मैफील लुटली, पण...
10
अजित पवारांना मोठा झटका! मतदानाच्या आधीच राष्ट्रवादीचा उमेदवारच भाजपात; BJP ला दिला पाठिंबा
11
KL Rahul Break Kohli Record: बिग सरप्राइज! KL राहुलनं मोडला किंग कोहलीचा रेकॉर्ड! MS धोनी नंबर वन
12
बुलेट प्रेमींसाठी खुशखबर! रॉयल एनफिल्डनं Goan Classic 350 मध्ये केला जबरदस्त बदल
13
"तुझ्या वडिलांना तीन-तीन गोळ्या घ्याव्या लागतात, मी..."; गणेश नाईकांचा श्रीकांत शिंदेंवर घणाघात, एकनाथ शिंदेंनाही इशारा
14
अंबरनाथमध्ये शिंदेसेनेची खेळी, भाजपाला बसला झटका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीला लागली लॉटरी
15
WPL 2026 : मुंबई इंडियन्सचा सामना प्रेक्षकांविना खेळवण्याची वेळ; जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Pune Municipal Election: "...तर मला दिल्लीत जाऊन चर्चा करावी लागेल"; युती धर्माच्या विधानानंतर अजित पवारांचा इशारा
17
भाजपा-AIMIM युतीचा दुसरा अंक! एमआयएमच्या पाठिंब्यावर BJP नेत्याचा मुलगा बनला स्वीकृत नगरसेवक
18
सायबर हल्ल्यापासून बचावासाठी वापरा USB कंडोम, कुठे अन् कसा वापर करायचा? जाणून घ्या...
19
माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची अचानक तब्येत बिघडली; दिल्लीतील AIIMS मध्ये दाखल
20
Crime: सेक्ससाठी नकार देणाऱ्या पत्नीची गळा आवळून हत्या, पोस्टमॉर्टम रिपोर्टमुळं फुटलं पतीचं पितळ!
Daily Top 2Weekly Top 5

कारगिलमधून बेपत्ता झालेली नागपूरची महिला LOC पार करून पाकिस्तानात पोहचली, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 12:53 IST

स्थानिक सुरक्षा यंत्रणेने तिला ताब्यात घेतल्याचे सांगितले आहे. सुनीता पाकिस्तानी तपास यंत्रणेच्या ताब्यात असून तिची चौकशी सुरू आहे.

भारत-पाकिस्तान यांच्या तणावात नागपूरमधील ३६ वर्षीय महिला सुनीता काश्मीरच्या कारगिलमधून एलओसी रेषा पार करून पाकिस्तानात पोहचली आहे. या घटनेने भारतीय सुरक्षा यंत्रणा आणि गुप्तचर संस्थाही हैराण आहे. पाकिस्तानातील एका पादरीला भेटण्यासाठी सुनीताने हे धाडस केले. पादरीसोबत सुनीताची ऑनलाईन ओळख झाली होती. याआधीही तिने दोनदा नियंत्रण रेषा ओलांडण्याचा प्रयत्न केला परंतु तिसऱ्या प्रयत्नात ती पाकिस्तानात पोहचली. याआधी दोन वेळा अटारी बॉर्डरवर तिला थांबवण्यात आले होते.

मंगळवारी सुनीताने तिच्या मुलाला कारगिलच्या सीमाभागातील हंदरमाण येथे एकटे सोडून एलओसी पार केली. मी लवकर येईन असं तिने मुलाला सांगितले परंतु उशीर झाला तरी ती न परतल्याने स्थानिकांनी लडाख पोलिसांना ही घटना कळवत मुलाला त्यांच्याकडे सुपूर्द केले. भारतीय अधिकाऱ्यांनी अधिकृतपणे सीमेपलीकडे तिला पकडल्याची पुष्टी केली नाही. परंतु टाइम्स ऑफ इंडियाने सूत्रांच्या हवाल्याने सुनीताला पाकिस्तानच्या गावात पाहिले, त्यानंतर स्थानिक सुरक्षा यंत्रणेने तिला ताब्यात घेतल्याचे सांगितले आहे. सुनीता पाकिस्तानी तपास यंत्रणेच्या ताब्यात असून तिची चौकशी सुरू आहे.

तर सुनीता मानसिक रुग्ण आहे. नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्ण हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरू होते. याआधीही सुनीताने दोन वेळा भारताची सीमा ओलांडण्याचा प्रयत्न केला होता. मार्चमध्ये अमृतसर पोलिसांनी सुनीता आणि तिच्या मुलाला अटारी बॉर्डरवर पकडले. कुठल्याही कागदपत्राविना ती पाकिस्तानात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होती असं तिच्या कुटुंबाने सांगितले. ही महिला प्रत्यक्षात पाकिस्तानात पोहचली होती. तपासात २०२० मध्ये तिचा घटस्फोट झाला होता तेव्हापासून ती आणि मुलगा वेगळे राहत असल्याचे समोर आले असं कारगिलमधील पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

नेमकी घटना काय?

नागपूरची एक ३६ वर्षीय महिला आपल्या १५ वर्षांच्या मुलासह कारगिलमध्ये आली होती. मुलाला हॉटेलमध्ये एकटे सोडून ती गावात गेली आणि परतलीच नाही. ही घटना १४ मे रोजी घडली. ही महिला ९ मे रोजी आपल्या मुलासह एका हॉटेलमध्ये थांबली होती. १४ मे रोजी ती हंदरमाण गावात गेली, पण परतली नाही. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी ही बाब पोलिसांना कळवली.पोलिसांनी मुलाची चौकशी केल्यावर कळले की ते दोघं पंजाबमधून प्रवास करत कारगिलला आले होते. महिला तिच्या पतीपासून काही वर्षांपूर्वी वेगळी राहत होती. तीने यापूर्वी नागपूर आणि मुंबईतील रुग्णालयांमध्ये नर्स म्हणून काम केले आणि आता ती टेलरिंगचा व्यवसाय करत होती.

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान