शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

‘लष्कराने संशयित दहशतवादी समजून गोळीबार केला’; नागालँड गोळीबार घटनेवर अमित शहांचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2021 16:46 IST

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज नागालँडमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेवर लोकसभेत महत्वाची माहिती दिली.

नवी दिल्ली: संसदेच्या हिवाळी अधिवेशनात नागालँडमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेचे पडसाद उमटले आहेत. या घटनेवरुन विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज नागालँड गोळीबारावर लोकसभेत निवेदन दिले आहे. लष्कराने संशयित समजून गोळीबार केल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. 

अमित शहा काय म्हणाले ?लोकसभेत बोलताना अमित शहा म्हणाले की, 'बंदी घातलेल्या नॅशनल साेशलिस्ट काउंसिल ऑफ नागालॅंड-के( NSCN-K) या संघटनेच्या युंग ओंग गटाचे अतिरेकी या भागात लपल्याची माहिती लष्कराला मिळाली हाेती. त्यानंतर जवानांनी शाेध माेहीम सुरू केली हाेती. सुरक्षा दलांना एका बाेलेराे कारमधून अतिरेकी येत असल्याची माहिती मिळाली हाेती. मजूरही बाेलेराे पिकअप वाहनातून येत हाेते.'

'अंधारामध्ये गाडी ओळखण्यात चूक झाली. जवानांनी गाडी थांबविण्याचा इशारा दिला. मात्र, गाडी थांबली नाही. त्यामुळे जवानांनी गाेळीबार सुरू केला. जवानांना चूक लक्षात येईपर्यंत 6 जणांचा गाडीतच मृत्यू झाला हाेता. या घटनेतील दोन गंभीर व्यक्तींना उपचारासाठी आसामामध्ये पाठवण्यात आले आहे. तर काही जणांवर नागालँडमध्ये उपचार सुरू आहे. या घटनेनंतर स्थानिकांनी लष्कराची 2 वाहने जाळली आणि मोठा हिंसाचार उफळला. यात लष्कराचा एक जवान शहीद झाला आणि अनेकजण जखमी झाले. तसेच त्या घटनेत आणखी 7 लोक मरण पावले.'

विशेष तपास पथकाची स्थापना

या घटनेच्या तपासासाठी एक विशेष तपास पथक स्थापन करण्यात आल्याची माहिती अमित शहा यांनी दिली. एका महिन्यात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश या पथकाला दिले आहेत. दरम्यान, रविवारी संध्याकाळी नागालँडच्या मौन शहरात आसाम रायफल्सवर हल्ला करण्यात आला. प्रत्युत्तराच्या कारवाईत एक नागरिक ठार आणि एक जखमी झाला. या घटनेवर लष्कराकडून दुःख व्यक्त करण्यात आले आहे. 

काय आहे प्रकरण ?

NSCN(K) या बेकायदेशीर संघटनेच्या युंग आंग गटाचे दहशतवादी समजून लष्कराने काहीजणांवर गोळीबार केला. या घटनेत, 6 जणांचा मृत्यू झाला. पण, मृत्यू झालेल्यांमध्ये कोळसा खाणीतील कामगार होते. या घटनेनंतर संतत्प स्थानिकांनी लष्कराची वाहने जप्त केली. यावेळी झालेल्या हिंसाचारात एक जवान शहीद झाला, तर आणखी 7 स्थानिकांचा मृत्यू झाला.

टॅग्स :Amit Shahअमित शाहParliamentसंसदnagaland-pcनागालँडPoliceपोलिस