ििि
By Admin | Updated: February 14, 2015 23:52 IST2015-02-14T23:52:16+5:302015-02-14T23:52:16+5:30
श्रीरामवूर दि. ०६ (वार्ताहर) : राहाता तालुक्यांतील चितळीगांव व परिसरातील जमिनी तेथील जॉन डिसलरीजचे स्पेंट वॉश् व हवेतील प्रदुषणामुळे शेकडो एकर जमीन नापीक झाली आहे व नागरीकांचा आरोग्यचाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे डिसलीरीने हे गांव दत्तक घेऊन गावात नागरी सुविधा निर्माण करुन विकास करावा अशी ग्रामस्थांची मागणी होत आहे.

ििि
श रीरामवूर दि. ०६ (वार्ताहर) : राहाता तालुक्यांतील चितळीगांव व परिसरातील जमिनी तेथील जॉन डिसलरीजचे स्पेंट वॉश् व हवेतील प्रदुषणामुळे शेकडो एकर जमीन नापीक झाली आहे व नागरीकांचा आरोग्यचाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे डिसलीरीने हे गांव दत्तक घेऊन गावात नागरी सुविधा निर्माण करुन विकास करावा अशी ग्रामस्थांची मागणी होत आहे.ग्रामस्थाच्या मागणीच्या विचार तातडीने विचार केला नाही तर कोणत्याही क्षणी या मागणीसाठी आंदोलन छेडले जाईल असा इशारा एका निवेदनाद्वारे ग्रामस्थांचे वतीने उपसरपंच शिवाजीराव वाघ, पं. सं. सदस्य, ॲड. अशोक वाघ, गणेश कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब वाघ, बाबासाहेब वाघ, कॉ. बाळासाहेब सुरडे, शैलेश वाघ, रविंद्र वाघ, रामराव वाघ, बाळासाहेब वाघ, सोपान वाघ, अजय गायकवाड, दिपक वाघ, भाऊसाहेब वाघ कुंडलीकराव वाघ, गुजीनाथ वाघ, अशोक वाघ, भैय्या वाघ, दिलीप वाघ आदि प्रमुखासंह शेकडो शेतकर्यांचे स्वाक्षरीने दिले आहे.महाराष्ट्र शासनाला चितळी डिसलरी (आसवानी प्रकल्प) सुरु करण्यासाठी सुमारे ३०० एकर जमिन शेतकर्याकडुन ताब्यांत घेतली गेली. १९६० साली हा प्रकल्प कार्यान्वीत झाला २००८ पर्यंत शासन व पश्चीम विकास महामंडळाचे देखरेखीखाली असलेल्या व्यवस्थापनाने डिसलरी चालवली. या काळात डिसलरी मधुन बाहेर पडणारे स्पेंट वॉश (घाण पाणी) च्या पाण्यामुळे या भागातील विहीरी व इंधन विहीरीचे पाणी दुषीत झाले. त्यामुळे गावात पिण्याचे पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली. तसेच हजारो एकर परिसरातील शेतजमीन नापीक होऊन उध्वस्त झाली. शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गावाचे विकासावर परिणाम झाला.चितळी डिसलरी प्रकल्प हा जॉन डिसलरीज प्रा. लि. ही कंपनी सध्या चालवित आहे. कंपनीच्या अध्यक्षांना ग्रामस्थांनी नुकतेच वरील निवेदन पाठविले आहे. त्यामध्ये नमुद केले आहे की स्पेंट वॉश मुळे जमिनी नापीक झालेमुळे तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे प्राधान्याने कंपनीमध्ये तरुणांना समावुन घ्यावे बाहेरील कामगाराची भरती करुन नये जे स्थानिक कामगार कंंत्राटी पध्दतीने काम करतात त्यांना रिक्त जागावर कायम स्वरुपी घ्यावे. कंत्राटी पध्दत बंद करावी सर्व उद्योगाचे मुल्यांकन करुन पुर्वीप्रमाणे स्टाफ पॅटर्न तयार करावा व स्थानीक तरुणांना सामावुन घ्यावेसन २००१ ते सन २०१४ या कालावधीत वीज, पाणीवही, देखभाल, दुरुस्ती खर्च नोकर पगार, टी.सी.एल व ॲलम यांच्या दरात भरमसाठ वाढ झाली आहे. त्याप्रमाणे फेरफार करुन ग्रामपंचायतीस वाढीव रक्कम द्यावी. परिसरात शिरपुर पॅटर्न प्रमाणे साखळी बंधारे करावेत. नागरीकांना आरोग्य व शैक्षणीक सुविद्या द्याव्यात. गावठाण विस्तारासाठी लगतच्या गट नंबर मधील डिसलरीचे ताब्यात असलेल्या जमिनी ग्रामपंचायतीकडे वर्ग कराव्यात अशा अनेक मागण्या आहेत.जॉन डिसलरीने गेल्या १५ दिवसात ग्रामस्थांच्या मागण्या पुर्ण करणेबाबात निर्णय घेतला नाही तर कोणत्याही क्षणी आंदोलन करतील. असा इशाराही निवेदनात वरील प्रमुखांनी दिला आहे. रमेश कोठारी, श्रीरामपूर