शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

चीनमधील रहस्यमय आजारानं टेन्शन वाढवलं, मोदी सरकार अ‍ॅक्शन मोडवर; राज्यांना दिला महत्त्वाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2023 16:56 IST

आरोग्य मंत्रायलाचे परिस्थितीवर बारकाईने लक्ष...

चीनमध्ये  न्यूमोनियाच्या रुग्ण संख्येत वाढ होत असतानाच केंद्रातील मोदी सरकारने राज्यांना रुग्णालयांच्या तयारीसंदर्भात आढावा घेण्याचा सल्ला दिला आहे. चीनमधील या रहस्यमय आजाराच्या पार्श्वभूमीवर, आरोग्य मंत्रालयाने श्वसनाशी संबंधित आजारांच्या तयारीसंदर्भात सक्रिय आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सार्वजनिक आरोग्य आणि रुग्णालयाच्या तयारीसंदर्भात तत्काळ आढावा घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

केंद्राचं परिस्थितीवर बारकाईने लक्ष -सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश, कोरोना संदर्भातील दक्षतेच्या धोरनाची सुधारित ऑपरेशनल मार्गदर्शक तत्त्वे' लागू करतील. श्वसनाशी संबंधी आजारांची वाढ प्रामुख्याने इन्फ्लूएंझा, मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया, SARS-CoV-2 सारख्या सर्वसामान्य कारणांमुळे होते. आरोग्य मंत्रायलाचे परिस्थितीवर बारकाईने लक्ष आहे. तसेच, याला घाबरण्याची काहीही आवश्यकता नाही, असेही मंत्रालयाने म्हटले आहे.

चीनमध्ये संसर्ग वाढला -याच बरोबर, उत्तर चीनमधील मुलांमध्ये श्वसनाचे आजार आणि ‘एच 9 एन 2’ संसर्गाच्या प्रकरणांवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे. तसेच, चीनमध्ये आढळलेल्या एव्हीयन इन्फ्लूएंझा (एच 9 एन 2) आणि श्वसन रोगांचा धोका भारताला कमी आहे. चीनमधील इन्फ्लूएंझा परिस्थितीमुळे उद्भवू शकणाऱ्या कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी भारत तयार आहे. उत्तर चीनमधील मुलांमध्ये श्वसनाच्या आजाराची प्रकरणे मोठ्या प्रमाणावर नोंदवली गेली आहेत.

संक्रमण पसरण्याचा धोका कमी -‘डब्ल्यूएचओने केलेल्या एकूण जोखीम मूल्यमापनात या संसर्गाचा मानव ते मानव प्रसार होण्याची शक्यता कमी आहे आणि आतापर्यंत आढळलेल्या ‘एच 9 एन 2’ प्रकरणांमध्ये मृत्यूदर कमी आहे,’ असेही मंत्रालयाने म्हटले आहे.  

टॅग्स :chinaचीनHealthआरोग्यIndiaभारतhospitalहॉस्पिटल