भारतीय वंशाच्या विद्याथ्र्याने शोधले गूढ कृष्णविवर

By Admin | Updated: August 19, 2014 01:37 IST2014-08-19T01:37:35+5:302014-08-19T01:37:35+5:30

भारतीय वंशाच्या विद्याथ्र्याने ब्रrांडातील सर्वात दुर्मिळ आणि गूढ वस्तू मानल्या जाणा:या मध्यम आकाराच्या एका कृष्णविवराचा शोध लावून त्याचे मोजमाप घेतले.

Mysterious black hole discovered by student of Indian origin | भारतीय वंशाच्या विद्याथ्र्याने शोधले गूढ कृष्णविवर

भारतीय वंशाच्या विद्याथ्र्याने शोधले गूढ कृष्णविवर

नवी दिल्ली : भारतीय वंशाच्या विद्याथ्र्याने ब्रrांडातील सर्वात दुर्मिळ आणि गूढ वस्तू मानल्या जाणा:या मध्यम आकाराच्या एका कृष्णविवराचा शोध लावून त्याचे मोजमाप घेतले.  
मेरीलँड विद्यापीठात खगोलशास्त्र पदवी अभ्यासक्रमाचा विद्यार्थी धीरज पाशाम आणि त्याच्या दोन सहका:यांनी या कृष्णविवराचा शोध लावला. 
पृथ्वीपासून 12 दशलक्ष प्रकाशवर्ष दूर असलेल्या एम 82 या प्रसिद्ध आकाशगंगेत हे कृष्णविवर आहे. धीरज आणि त्याच्या दोन सहका:यांनी या दुर्मिळ कृष्णविवराचे मोजमाप घेतले. त्यांचे निष्कर्ष नेचर या नियतकालिकाने ऑनलाईन प्रसिद्ध केले आहेत. 
मध्यम द्रव्यमान असलेल्या कृष्णविवरांचे मोजमाप घेणो खूपच कठीण असते, एवढेच नाही तर कधी कधी त्यांच्या अस्तित्वावरदेखील प्रश्नचिन्ह लावले जाते. त्यामुळेच धीरज आणि त्याच्या सहका:यांनी मध्यम द्रव्यमान असलेल्या कृष्णविवराचा शोध घेऊन त्याचे मोजमाप घेणो महत्त्वपूर्ण ठरले आहे. मध्यम आकाराची कृष्णविवरे कशी तयार होतात याविषयीही फारशी माहिती उपलब्ध नाही. ही कृष्णविवरे इतर कृष्णविवरांप्रमाणोच व्यवहार करत असतील यावरही काही खगोलशास्त्रज्ञ शंका व्यक्त करतात. मध्यम आकाराच्या कृष्णविवरांना कृष्णविवरांच्या श्रेणीत गृहीत धरले जात नव्हते. ते अस्तित्वात आहेत काय? किंवा ते अस्तित्वातच नाहीत? त्याची गुणवैशिष्टय़े काय? असा सवाल खगोलशास्त्रज्ञ करत असत. या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आतार्पयत आमच्याकडे माहिती नव्हती. मात्र, आता ही माहिती मिळाली आहे, असे या विद्यापीठातील खगोलशास्त्रचे प्रोफेसर रिचर्ड मुशोत्झकी यांनी सांगितले. मध्यम आकाराच्या कृष्णविवराचे मोजमाप यापूर्वीही घेतले गेले आहे; मात्र धीरज व त्याच्या पथकाने घेतलेले मोजमाप पहिलेच तंतोतंत मोजमाप आहे, असेही ते म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
4ब्रrांडात अगणित कृष्णविवरे आहेत. आपल्या मिल्की वे या आकाशगंगेतच 1क्क् दशलक्ष एवढी कृष्णविवरे असू शकतील, असे मानले जाते. जवळपास सर्वच कृष्णविवरे मोठी किंवा विराट या दोनच श्रेणीत मोडतात. मोठी कृष्णविवरे आपल्या सूर्याच्या वस्तुमानाहून 1क् ते 1क्क् पट मोठी असतात. ही कृष्णविवरे म्हणजे मृत्युमुखी पडणा:या ग्रहाचे अवशेष असतात. 
 
4विराट कृष्णविवरे ही आपल्या सूर्याच्या द्रव्यमानाहून लाखो पट मोठी असतात आणि ती बहुतांश आकाशगंगेच्या मध्यवर्ती भागात असतात; मात्र ब्रrांडात काही गूढ प्रकारची कृष्णविवरेही विखुरलेली असून ती म्हणजे मध्यम आकाराची कृष्णविवरे. या कृष्णविवरांचा शोध लावणो कठीण असल्यामुळे त्यांना गूढ मानले जाते.

 

Web Title: Mysterious black hole discovered by student of Indian origin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.