शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

Karnataka: काँग्रेस आमदार भाजपाच्या मदतीला, काँग्रेस-जेडीएस तोंडावर आपटले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2018 18:49 IST

भाजपाचे नेते आमच्या आमदारांच्या पत्नींना फोन करून पैसे आणि मंत्रिपदाची ऑफर देत आहेत, घोडेबाजाराला उधाण आलं आहे, असा दावा करणारे काँग्रेस नेते आता तोंडावरच पडलेत.

बेंगळुरू - भाजपाचे नेते आमच्या आमदारांच्या पत्नींना फोन करून पैसे आणि मंत्रिपदाची ऑफर देत आहेत, घोडेबाजाराला उधाण आलं आहे, असा दावा करणारे काँग्रेस नेते आता तोंडावरच पडलेत. 'वास्तवात असं काही झालंच नव्हतं', असा खुलासा एका काँग्रेस आमदारानंच केल्यानं त्यांची चांगलीच फजिती झालीय आणि भाजपाला मोठा दिलासा मिळाला आहे. 

कर्नाटकातील येल्लापूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार शिवराम हेब्बर यांनी पक्षाचं बिंग फोडलंय. कथित ऑडिओ क्लिपमधील आवाज माझ्या बायकोचा नव्हता, असं त्यांनी फेसबुक पोस्टमधून स्पष्ट केलं आहे. भाजपा नेत्याने माझ्या पत्नीशी संपर्क साधला होता आणि काहीतरी ऑफर दिली होती, अशी बातमी एका वृत्तवाहिनीवरून मला कळली. परंतु, त्या रेकॉर्डिंगमधील आवाज माझ्या पत्नीचा नाही, असं हेब्बर यांनी नमूद केलं आहे. माझ्या पत्नीला कुठल्याही भाजपा नेत्याने फोन केला नव्हता, असंही त्यांनी पोस्टमध्ये लिहिलंय.

कर्नाटक विधानसभेत सत्तास्थापनेचं नाटक भलतंच रंगलं होतं. निवडणूक निकालात सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपाला सरकारपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस-जेडीएसनं हातमिळवणी केली होती. त्यांची ही खेळी यशस्वी ठरली होती आणि येडियुरप्पांना परीक्षेआधीच 'पेपर टाकावे' लागले होते. १०४ जागांवरून ११२ वर पोहोचण्यासाठी भाजपा नेते जुळवाजुळव, 'सेटिंग' करत असताना, काँग्रेस-जेडीएसनं त्यांच्यावर घोडेबाजाराचा आरोप केला होता. आपल्या आमदारांना भाजपानं १०० कोटींची ऑफर दिल्याचा दावा करून जेडीएस नेते कुमारस्वामींनी खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर, काँग्रेस आमदारांच्या पत्नींना भाजपा नेते फोन करून ऑफर देत असल्याचा गौप्यस्फोट काँग्रेसनं केला होता. त्यासाठी एक ऑडिओ क्लिपही त्यांनी ऐकवली होती. त्यामुळे भाजपा संशयाच्या फेऱ्यात अडकली होती. बहुमत चाचणीआधीच राजीनामा दिल्यानं त्यांची नाचक्की झालीच, पण बदनामीही झाली होती. मात्र, आता शिवराम हेब्बर यांच्या खुलाशाने त्यांच्यावरील हा डाग पुसला जाऊ शकतो.

टॅग्स :shivaram hebbarशिवराम हेब्बरKarnatakकर्नाटकcongressकाँग्रेसMLAआमदारKarnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८