उत्तर प्रदेशातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका तरुणाने आपल्या पत्नी विरोधात तक्रार दाखल केली आहे. पत्नी रात्री दात खाऊन त्याला मारण्यासाठी धावत येते आणि मी नागीण आहे, तुला मारुन टाकेन अशी धमकी देत असल्याचे म्हटले आहे. यावर आता उपजिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार, या जोडप्याला कुटुंब समुपदेशन केंद्रात पाठवण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, लोढासा येथील मेराजने संपूर्ण समाधानकडे तक्रार दाखल केली. २०२३ मध्ये थानगाव येथील नसीमुनशी लग्न केले. काही दिवसांतच त्यांच्यात मतभेद निर्माण झाले. सुरुवातीला त्याला वाटले की त्याची पत्नी मानसिकदृष्ट्या अस्थिर आहे, म्हणून त्याने तिच्यावर भूतबाधा करण्याचा उपचार केला. पण तरीही तिच्या सवयी सुधारल्या नाहीत.
२ तप सत्तेत, २४ वर्षांत काय-काय झाले? नरेंद्र मोदींनी सांगितली CM ते PM प्रवासाची Inside Story...
रोज दात खावून रागाने अंगावर यायची
नसीमुन दररोज रात्री त्याच्यावर धावते, दात खात यायची. "मी नागीण आहे आणि मी तुला मारून टाकेन," अशी धमकी रोज ती द्यायची, असेही त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. पोलिस तक्रार दाखल करण्यात आली होती, पोलिस निरीक्षक अनिल सिंह म्हणाले की, या जोडप्यात मतभेद आहेत. त्यांना कुटुंब सल्ला केंद्रात पाठवण्यात आले आहे.
Web Summary : In Uttar Pradesh, a man complained his wife threatens him nightly, claiming she's a snake and will kill him. The couple has been referred to a family counseling center to resolve their marital issues, which involved suspected mental instability.
Web Summary : उत्तर प्रदेश में एक व्यक्ति ने शिकायत की कि उसकी पत्नी उसे मारने की धमकी देती है, और कहती है कि वह नागिन है। दंपति को पारिवारिक परामर्श केंद्र भेजा गया है ताकि उनके वैवाहिक मुद्दों को हल किया जा सके, जिसमें मानसिक अस्थिरता का संदेह था।