शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

माझं संपुर्ण कुटुंब शिवभक्त, आम्ही धर्माची दलाली करत नाही - राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2017 14:46 IST

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी सध्या सोमनाथ मंदिरात अहिंदू (Non-Hindu) म्हणून नोंद करण्यात आल्यामुळे चांगलेच चर्चेत आहेत. विरोधक राहुल गांधींना या मुद्द्यावरुन घेरण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान राहुल गांधींचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये ते विरोधकांना चोख उत्तर देताना दिसत आहेत.

ठळक मुद्दे राहुल गांधी सोमनाथ मंदिरात अहिंदू म्हणून नोंद करण्यात आल्यामुळे चांगलेच चर्चेत आहेतराहुल गांधींचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे या व्हिडीओमध्ये राहुल गांधी सांगत आहेत की, माझी आजी आणि संपुर्ण कुटुंब शिवभक्त आहे

नवी दिल्ली - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी सध्या सोमनाथ मंदिरात अहिंदू (Non-Hindu) म्हणून नोंद करण्यात आल्यामुळे चांगलेच चर्चेत आहेत. विरोधक राहुल गांधींना या मुद्द्यावरुन घेरण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान राहुल गांधींचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये ते विरोधकांना चोख उत्तर देताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये राहुल गांधी सांगत आहेत की, माझी आजी आणि संपुर्ण कुटुंब शिवभक्त आहे. राहुल गांधींच्या या वक्तव्यानंतर उपस्थित लोक टाळ्या वाजवतानाही दिसत आहेत. 

'आम्ही काही गोष्टींना खासगी ठेवण्यावर विश्वास ठेवतो. यासंबंधी आम्ही बोलत नाही. कारण आम्हाला वाटतं की, जो आमचा धर्म आहे तो आमची खासगी गोष्ट आहे, तो आमच्या आत आहे. यासाठी आम्हाला कोणत्याही प्रमाणपत्राची गरज नाही. ही जी आमची गोष्ट आहे त्याचा आम्हाला ना व्यापार करायचा आहे, ना आमची दलाली करण्याची इच्छा आहे', असं राहुल गांधी व्हिडीओत बोलताना दिसत आहेत. राहुल गांधींचा हा व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे. 

 

महत्वाची गोष्ट म्हणजे राहुल गांधी यांच्यासोबत राज्यसभेचे खासदार आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींचे राजकीय सचिव अहमद पटेल यांचीही नोंद अहिंदू म्हणून करण्यात आली होती. मंदिराच्या सुरक्षा रजिस्टरमध्ये ही नोंद काँग्रेसचे मीडिया कोऑर्डिनेटर मनोज त्यागी यांनी केली होती. मंदिराच्या नियमानुसार, अहिंदूंना रजिस्टरमध्ये नोंद करणे अनिवार्य आहे. मात्र रजिस्टरवर राहुल गांधींची सही नाहीये. राहुल गांधी यांच्यासोबत अहमद पटेल यांच्याशिवाय राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोतदेखील उपस्थित होते. 

राहुल गांधी यांनी बुधवारी 29 नोव्हेंबरला गुजरातमधील सोमनाथ मंदिराला भेट देत दर्शन घेतलं. गेल्या तीन महिन्यात 19 वेळा राहुल गांधींनी मंदिराला भेट दिली आहे. यावरुनच पंतप्रधान मोदींनी टीका केली होती. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांचं नाव घेतना सोमनाथ मंदिरात तुमच्या पुर्वजांनी बनवलेलं नाही अशी टीका मोदींनी केली होती. नरेंद्र मोदी बोलले होते की, 'आज सोमनाथ संपुर्ण जगभरात प्रसिद्द आहे. आज ज्या लोकांना सोमनाथ मंदिराची आठवण येत आहे, त्यांना इतिहास माहित आहे का विचारा'.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीHinduहिंदूcongressकाँग्रेस