माझा मुलगा निरपराध; मेहदीच्या पित्याची ग्वाही
By Admin | Updated: December 14, 2014 01:33 IST2014-12-14T01:33:03+5:302014-12-14T01:33:03+5:30
मेहदी मसरूर बिस्वास याला पोलिसांनी अटक केल्याची आपल्याला माहिती नाही आणि आपल्या मुलाचे इंटरनेट अकाऊंट हॅक करण्यात आले होते, असे मेहदीचे पिता एम. बिस्वास यांनी म्हटले आहे.

माझा मुलगा निरपराध; मेहदीच्या पित्याची ग्वाही
अटकेची माहिती नाही : अकाउंट हॅक झाले
कोलकाता : मेहदी मसरूर बिस्वास याला पोलिसांनी अटक केल्याची आपल्याला माहिती नाही आणि आपल्या मुलाचे इंटरनेट अकाऊंट हॅक करण्यात आले होते, असे मेहदीचे पिता एम. बिस्वास यांनी म्हटले आहे.
‘त्याला अटक झाल्याची आपल्याला माहिती नाही. त्याचा फोन बंद आहे. त्यामुळे आम्ही बेंगळुरूला जाण्याचे ठरविले आहे. पोलिसांनीही आमच्याशी संपर्क साधला नाही. आपल्या मुलाचा इसिसशी काही संबंध असेल यावर आपला विश्वास नाही. काल रात्री एका पत्रकाराने मला हे सांगितले. तेव्हा मी त्याला फोन करून याबाबत विचारले. हे सर्व कसे घडले हे आपल्याला माहीत नसल्याचे आणि आपले इंटरनेट अकाऊंट हॅक करण्यात आल्याचे त्याने मला सांगितले’, असे एम. बिस्वास म्हणाले.
आपल्याकडे ‘चॅनल 4’चे काही लोक आले होते, असे मेहदी म्हणाला होता, अशी माहिती एम. बिस्वास यांनी यावेळी दिली.
मेहदीचे पालक पश्चिम बंगालमध्ये राहतात. त्याला दोन बहिणी आहेत. त्याचे वडील राज्य विद्युत मंडळातील निवृत्त कर्मचारी आहेत. त्याच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये म्हणून ‘चॅनल 4’ने त्याचे पूर्ण नाव जाहीर केले नव्हते. हे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर मेहदीने टि¦टर अकाऊंट बंद केले होते. मेहदीचे हे टि¦टर अकाऊंट इस्लामिक स्टेटचे सर्वात प्रभावशाली टि¦टर अकाऊंट बनले होते. (वृत्तसंस्था)
बेकायदा कारवायांचा गुन्हा
4मेहदी बिस्वासविरुद्ध युद्ध पुकारणो आणि बेकायदेशीर कारवाया केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मेहदी हा आपला कर्मचारी असल्याचे आयटीसी लिमिटेडच्या कार्पोरेट कम्युनिकेशन्सने मान्य केले आहे.
पथक बेंगळुरुत
4नवी दिल्ली : मेहदीला अटक झाल्यानंतर ‘इसिस’च्या भारतातील कारवायांचा तपास करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) आणि इंटेलिजन्स ब्युरोचे (आयबी) एक पथक शनिवारी बेंगळुरुला रवाना झाले. बर्दवान स्फोटात सहभाग असलेल्या जमात-उल-मुजाहिदीन, बांगला देश (जेएमबी) या दहशतवादी संघटशी मेहदीचा संबंध असल्याचा एनआयएचा संशय आहे., असे गृहमंत्रलयाच्या अधिका:याने सांगितले.