शहरं
Join us  
Trending Stories
1
अयोध्या नगरीत श्रीराम मंदिरावर आज दिमाखात फडकणार भगवा ध्वज, वास्तूचे काम पूर्ण झाल्याचे प्रतीक; ध्वजावर तेजस्वी सूर्य, ॐ ही प्रतीकेही, अयोध्येत कडक सुरक्षा
2
‘अनामिक’ रोख देणग्यांबद्दल कोर्टाची भाजप, काँग्रेस आणि सरकारला नोटीस!
3
सिम इतरांना द्याल तर तुरुंगात जाल, दूरसंचार विभागाचा इशारा
4
पती, सासरच्या जाचापायी राज्यात २,३७३ महिलांनी संपविले जीवन, २०२३ मध्ये देशभरात २४ हजार जणींनी उचललं टोकाचं पाऊल
5
चायनीज तैपईला नमवून भारताच्या महिला कबड्डीपटूंनी पटकावला विश्वचषक
6
१५ वर्षांत कोणती वस्तू किती महागली? खिसा कसा रिकामा?
7
भारतीय वंशाचे उद्योगपती मित्तल सोडणार ब्रिटन, समोर येतंय असं कारण
8
कर्ज हवे? चिंता करू नका; तुमचे भविष्य सुरक्षित, तर बॅंका निश्चिंत
9
कंपन्यांच्या पगार खर्चात १०% वाढ होणार, नव्या कायद्यामुळे भार; अनेक जबाबदाऱ्याही पडणार
10
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? शांतता योजनेचा मसुदा तयार; पण युक्रेनसमोर मोठे दुहेरी संकट!
11
भारताशेजारील देशांमध्ये भूकंपांची मालिका सुरूच, आता या देशात भूकंपाचे धक्के; किती होती तीव्रता?
12
इथिओपियात ज्वालामुखी उद्रेक; राखेचे ढग भारताच्या दिशेने, DGCA चा विमान कंपन्यांना अलर्ट जारी
13
नागपुरातील पत्रकार परिषदेत भडकले होते 'ही मॅन' धर्मेंद्र; कंधार विमानाचे अपहरण अन् पाजीचा सच्चेपणा...
14
युपी विधानसभा, रेल्वे स्टेशन आणि शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; राजधानीत हायअलर्ट
15
चंद्रपूर पुन्हा हादरले; अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधम शिक्षकास अटक
16
एक व्यक्ती इथे नाही, त्याची उणीव...; धनंजय मुंडेंना परळीतील सभेत वाल्मिक कराडची आठवण
17
UAE ला जात होतं इंडिगो विमान, अचानकच 10000 वर्षांनंतर झाले ज्वालामुखीचे स्फोट अन् मग...!
18
“आता गृह मंत्रालय घेतले, पुढे भाजपावाले नितीश कुमारांचे CM पद काढून घेतील”; कुणाचा दावा?
19
सोन्याच्या खाणीत गुंतवणूक करा, 5 वर्षांची कर सूट मिळवा; अफगाणिस्तानची भारताला मोठी ऑफर
20
शिंदेसेनेला पुन्हा एकदा सहकाऱ्याचा धक्का, नगराध्यक्षपदाच्या उमेदवारचा भाजपमध्ये प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

"प्रत्येक सनातनीला माझा संदेश...", राकेश किशोर यांच्याजवळ पोलिसांना एक चिठ्ठी सापडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 15:08 IST

दोन दिवसापूर्वी सरन्यायाधीश बीआर गवई यांच्यावर बूट फेकल्याची घटना घडली. या घटनेनंतर दिल्ली पोलिस हाय अलर्टवर आहेत.

दोन दिवसापूर्वी सरन्यायाधीश बीआर गवई यांच्यावर बूट फेकल्याची घटना घडली. या घटनेनंतर दिल्ली पोलिस हाय अलर्टवर आहेत.  न्यायालय क्रमांक १ बाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. या कोर्टात सरन्यायाधीश खटल्यांची सुनावणी करतात. सुरक्षा अधिकाऱ्यांनाही दक्षता वाढविण्यास सांगण्यात आली आहे. दरम्यान, चौकशीदरम्यान पोलिसांना वकील राकेश किशोर यांच्याकडून एक चिठ्ठी सापडल्याची माहिती समोर आली आहे. या चिठ्ठीमध्ये त्यांनी सनातन धर्माचा कोणताही अपमान सहन करणार नाहीत असे म्हटले आहे.

"माझे विधान असंवेदनशील नव्हते, तर...", कर्जमाफीबद्दलच्या वादग्रस्त विधानावर बाबासाहेब पाटलांचा खुलासा

मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेमागील हेतूबद्दल किशोर यांना विचारपूस करण्यात आली. चौकशीदरम्यान त्याने सांगितले की मध्य प्रदेशातील खजुराहो मंदिरातील भगवान विष्णूच्या मूर्तीबद्दल सरन्यायाधीशांच्या टिप्पण्यांमुळे ते नाराज झाले होते. पोलिसांना त्या वकिलाकडून एक चिठ्ठी सापडली आहे. "माझा संदेश प्रत्येक सनातनीसाठी आहे. हिंदुस्थान सनातनचा अपमान सहन करणार नाही," यामध्ये असे लिहिले होते.

पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे आणि दोन अतिरिक्त सुरक्षा कर्मचारी तैनात केले आहेत. मंगळवारी दिल्ली पोलिस आयुक्त सतीश गोलचा यांनी सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत एक उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. याव्यतिरिक्त, एक अंतर्गत आदेश जारी करण्यात आला आहे, यामध्ये सुरक्षा कर्मचाऱ्यांना त्यांच्या तैनातीदरम्यान बूट फेकणे आणि शाई फेकणे यासारख्या घटनांसाठी सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

खासदार निलेश लंकेंनी संविधान भेट दिली

भर न्यायालयात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या या हल्ल्याचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त करण्यात आला. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार यांच्यासह अनेकांनी याचा तीव्र शब्दांत निषेध केला. महाराष्ट्रात विरोधी पक्षांकडून निषेध आंदोलने करण्यात आली. राकेश किशोर यांच्याविरुद्ध बंगळुरूमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच राकेश किशोर यांचे सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन आणि बार कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्यत्वही रद्द करण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी वकील राकेश किशोर यांची दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी निलेश लंके यांनी वकील राकेश किशोर यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आणि संविधानाची प्रत भेट म्हणून देण्याचा प्रयत्न केला. निलेश लंके यांनी याबाबत पत्रकारांना माहिती दिली. 

English
हिंदी सारांश
Web Title : Note Found on Lawyer: Sanatan Dharma Insult Will Not Be Tolerated

Web Summary : Following the shoe-throwing incident at Chief Justice Gavai, lawyer Rakesh Kishore, who opposes remarks on a Vishnu idol, was found with a note stating Sanatan Dharma's insult won't be tolerated. Security has been heightened, and an investigation is underway. MP Nilesh Lanke met Kishore and gifted him the Constitution.
टॅग्स :Courtन्यायालय