शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

इम्रान खान तुम्ही हृदय जिंकलात; नवज्योतसिंग सिद्धूंनी केली स्तुती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2019 19:34 IST

सिद्धू यांनी मोदी यांचेही आभार मानले.

नवी दिल्ली : पंजाब काँग्रेसचे आमदार आणि माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांनी करतारपूर कॉरिडॉरवरून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची स्तुती केली आहे. 'तुम्ही हृदय जिंकलात', अशा शब्दांत सिद्धू यांनी खान यांची स्तुती केली आहे.

आज पीओकेमधील करतारपूर कॉरिडॉरचे उद्घाटन करण्यात आले. यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, अभिनेता आणि खासदार सनी देओल आदी उपस्थित होते. नवज्योतसिंग सिद्धू हे देखील या कार्यक्रमाला आले होते. 

सिद्धू यांनी मोदी यांचेही आभार मानले. मोदी यांनी पुढाकार घेतल्याने करतारपूर साध्य झाला. त्यांना मुन्नाभाई एमबीबीएस स्टाईल मीठी पाठविली असल्याचे सिद्धू म्हणाले. 

सिद्धू इम्रान खान यांचे अभिनंदन करताना म्हणाले की, माझे मित्र इम्रान खान यांचे योगदान कोणीही नाकारू शकणार नाही. खान यांनी कॉरिडॉर उघडून चार पिढ्यांचे शीखांचे स्वप्न पूर्ण केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी राजकीय अंतर असले तरीही त्यांचेही आभार मानतो. माझे आयुष्य गांधी परिवारासाठी समर्पित असले तरीही या आड येणार नाही. मी मोदींना मुन्नाभाई एमबीबीएस स्टाईल मीठी पाठवित आहे. तसेच कॉरिडॉर खुले झाल्यानंतर त्यांनी फाळणीनंतर प्रथमच कुंपण उघडल्याचे ते म्हणाले. 

टॅग्स :Navjot Singh Sidhuनवज्योतसिंग सिद्धूKartarpur Corridorकर्तारपूर कॉरिडोरNarendra Modiनरेंद्र मोदीImran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तान