शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
4
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
5
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
6
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
7
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
8
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
9
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
10
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
11
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
12
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
13
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

'हिंदू धर्मावर माझी पूर्णपणे श्रद्धा, मी मंदिरातही जातो, पण....'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2019 8:34 PM

शिवसेनेच्या भूमिकेमुळे शिवसेनेनं हिंदुत्व सोडलं की, काँग्रेस-राष्ट्रवादीने हिंदुत्ववादी पक्षाला साथ का दिली

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाविकास आघाडीचे जनक खासदार शरद पवार यांनी इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राला मुलाखत दिली. त्यामध्ये पवार यांनी महाविकास आघाडी, काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादीचं सरकार आणि मोदींसोबतच्या बैठकीवरील प्रश्नांना स्पष्टपणे उत्तरे दिली. हिंदुत्ववादी संघटना किंवा पक्ष म्हणून शिवसेनेकडे पाहिले जाते. मात्र, शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत घरोबा केल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. 

शिवसेनेच्या भूमिकेमुळे शिवसेनेनं हिंदुत्व सोडलं की, काँग्रेस-राष्ट्रवादीने हिंदुत्ववादी पक्षाला साथ का दिली? असे अनेक प्रश्न विचारल जात आहेत. इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनाही हिंदुत्वासंदर्भातील एक प्रश्न विचारण्यात आला होता. भारतात हिंदुकरण झालंय असं तुम्हाला वाटतं का? असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना, नाही नाही... आपण हिंदुराष्ट्रात राहत आहोत, या मताशी मी सहमत नाही. आपण एममेकांच्या धर्मांचा आदर करतो, ती व्यक्तिगत बाब आहे. हिंदु धर्मावर माझी पूर्णपणे श्रद्धा आहे, मी मंदिरातही जातो. पण, सार्वजनिक जीवनात मी सर्वांचा आणि सर्वांसाठी आहे, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले. या मुलाखतीत शरद पवार यांनी महाविकास आघाडीतील जडण-घडण संदर्भातही मनमोकळेपणे गप्पा मारल्या. 

शरद पवार यांनी पुढाकार घेत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला एकत्र करत महाविकास आघाडी निर्माण केली. महाविकास आघाडीचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शिवसेना नेते उद्धव ठाकरेंनी शपथही घेतली. त्या प्रयोगाची देशात चर्चा झाली. त्यामुळेच, महाराष्ट्रात भाजपाला सत्तेपासून दूर ठेवणाऱ्या शरद पवारांचा चाणक्य असा उल्लेख देशपातळीवर होत आहे. विशेष म्हणजे, देशपातळीवर सर्व विरोधक एकत्र आले तर भाजपची घोडदौड रोखू शकतो, असे पवार यांनी यापूर्वीही बोलून दाखवले आहे.  तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींना आज देशात पर्याय पाहिजे आहे मात्र त्यांना पर्याय उभा करण्यात विरोधी पक्षांना अपयश आल्याचंही त्यांनी मान्य केलं. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाShiv Senaशिवसेना