शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

"माझा भाऊ कधीच हिंदूंचा अपमान करू शकत नाही’’, राहुल गांधींच्या बचावासाठी प्रियंका गांधी सरसावल्या  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2024 18:49 IST

Parliament Session 2024: राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आज लोकसभेत असं एक विधान केलं, ज्यामुळे वादाला तोंड फुटलं. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनीही सभागृहात उभं राहून त्याचा विरोध केला. संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हणणं ही गंभीर बाब आहे, असा आरोप भाजपा आणि मोदींनी केला. मात्र राहुल गांधी यांच्या बचावासाठी प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) ह्या धावून आल्या आहेत.

संसदेच्या अधिवेशनादरम्यान, आज लोकसभेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा झाली. यावेळी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी चर्चेला सुरुवात केली. तसेच संविधानाच्या मुद्द्यावरून केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर चौफेर टीका केली. राहुल गांधी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात संविधानाची प्रत हातात घेऊन केली. मात्र यादरम्यान, राहुल गांधी यांनी असं एक विधान केलं, ज्यामुळे वादाला तोंड फुटलं. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सभागृहात उभं राहून त्याचा विरोध केला. संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हणणं ही गंभीर बाब आहे, असा आरोप भाजपा आणि मोदींनी केला. मात्र राहुल गांधी यांच्या बचावासाठी प्रियंका गांधी ह्या धावून आल्या आहेत. राहुल गांधी यांनी हे विधान भाजपाला उद्देशून केलं आहे. हिंदू समाजाला उद्देशून नाही, असं प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे. 

राहुल गांधी म्हणाले की, मोदी यांनी आपल्या भाषणामध्ये एके दिवशी सांगितलं होतं की, भारताने कधीही कुणावर हल्ला केलेला नाही. याचं कारण म्हणजे भारत अहिंसेला मानणारा देश आहे. भारत घाबरत नाही. आमच्या महापुरुषांनी घाबरू नका आणि घाबरवू नका, असं सांगितलंय. भगवान शिव सांगतात, घाबरू नका आणि घाबरवू नका आणि ते त्रिशूळ जमिनीमध्ये गाडतात. दुसरीकडे जे लोक स्वत:ला हिंदू म्हणवतात, ते २४ तास केवळ हिंसा, हिंसा, हिंसा आणि द्वेष, द्वेष, द्वेश करत असतात. तुम्ही हिंदू असूच शकत नाही. हिंदू धर्मात सत्याची साथ दिली पाहिजे, असं स्पष्टपणे लिहिलं आहे.

दरम्यान, राहुल गांधी यांच्या विधानावरून भाजपा आणि सत्ताधारी पक्षाने गोंधळ घालण्यास सुरुवात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही खुर्चीवरून उठून उभे राहिले. तसेच संपूर्ण हिंदू  समाजाला हिंसक म्हणणं ही गंभीर बाब आहे, असे ते म्हणाले. त्यावर राहुल गांधी यांनी मोदी आणि भाजपा हा संपूर्ण हिंदू समाज असू शकत नाही, असं विधान केलं.  

टॅग्स :lok sabhaलोकसभाcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीPriyanka Gandhiप्रियंका गांधी