शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
2
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
3
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा
4
अजित पवारांचे माहित नाही, पण भुजबळ नाराज असल्याचे ऐकले, त्यांना अंदाज आलाय; जयंत पाटलांचे स्पष्ट संकेत
5
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
6
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
7
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
8
८४ वर्षांपूर्वी दोन भावांनी McDonald'sची केलेली सुरुवात; आज ११९ देशांत ४२००० पेक्षा अधिक आऊटलेस्ट
9
सावधान! इंटरनेटलाच डॉक्टर मानता?; तर तुम्हीही ठरू शकता Idiot Syndrome चे बळी
10
Kangana Ranaut Edcuation : निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बॉलिवूडच्या 'क्वीन'चं शिक्षण ऐकून बसेल धक्का
11
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
12
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
13
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
14
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
15
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
16
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
17
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
18
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
19
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
20
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'

'माझा मेंदूच माझा शत्रू'... न्यूज अँकरच्या सुसाइड नोटने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2018 12:30 PM

हैदराबादेत एका न्यूज अँकरनं आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्वतःच्या घरातील पाचव्या मजल्यावरून उडी घेऊन तिने ही आत्महत्या केली आहे.

तेलंगणा- हैदराबादेत एका न्यूज अँकरनं आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्वतःच्या घरातील पाचव्या मजल्यावरून उडी घेऊन तिने ही आत्महत्या केली आहे. आत्महत्येआधी तिने एक सुसाइड नोटही मागे ठेवली आहे. त्या सुसाइड नोटमध्ये तिने आत्महत्येच्या कारणाचा उल्लेख केला आहे.रविवारी रात्री 36 वर्षीय न्यूज अँकर राधिका रेड्डी हिने ती राहत असलेल्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून जीवनयात्रा संपवली. पोलिसांना राधिकाच्या बॅगमध्ये एक सुसाइड नोटही मिळाली आहे. त्या सुसाइड नोटमध्ये तिनं लिहिलं आहे की, माझा मेंदूच माझा शत्रू आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून चौकशी सुरू केली आहे. पोलिसांच्या मते, ही टीव्ही अँकर मानसिक तणावाखाली होती.कुक्कटपल्ली पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक मजीद म्हणाले, राधिका हिनं कार्यालयातून घरी परतल्यानंतर काही वेळानं आत्महत्या केली. कार्यालयातून घरी परतल्यानंतर ती राहत असलेल्या इमारतीच्या गच्चीवर गेली आणि तिनं उडी घेऊन जीवनयात्रा संपवली. गच्चीवरून उडी घेतल्यानंतर राधिकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. राधिकाला 14 वर्षांचा एक मुलगा असून, तो स्वतःच्या आजी-आजोबांसोबत राहतो. राधिकाचा सहा महिन्यांपूर्वीच घटस्फोट झाला होता. राधिकाचा मुलगाही मानसिकदृष्ट्या अपंग असल्याचं समोर आलं आहे.  

टॅग्स :Suicideआत्महत्या