शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

"माझं 'ब्लाउज' चर्चेचा विषय बनला..."! काँग्रेस सोडणाऱ्या महिला नेत्यानं बोलून दाखवली 'व्यथा', काय म्हणाल्या?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2024 11:51 IST

काँग्रेसच्या या नेत्यांनी आसाम भाजप मुख्यालयात राज्य भाजपाध्यक्ष भाबेश कलिता आणि मंत्री पीयूष हजारिका तथा जयंत मल्ला बरुआ यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला.

आसाममध्ये राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेनंतर, गुवाहटीमध्ये 150 हून अधिक काँग्रेस आणि ऑल आसाम स्टूडेंट्स युनियनच्या (AASU) कार्यकर्त्यांनी रव‍िवारी भारतीय जनता पार्टी अर्थात भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांमध्ये माजी मंत्री बिस्मिता गोगोई, माजी विधानसभा अध्यक्ष जीबा कांता गोगोई यांची मुलगी, आसाम प्रदेश काँग्रेस कमेटीचे माजी अध्यक्ष अंजन दत्ता यांची मुलगी अंगकिता दत्ता आणि एएएसयचे माजी अध्यक्ष दीपांका कुमार नाथ यांचा समावेश आहे. 

काँग्रेसच्या या नेत्यांनी आसाम भाजप मुख्यालयात राज्य भाजपाध्यक्ष भाबेश कलिता आणि मंत्री पीयूष हजारिका तथा जयंत मल्ला बरुआ यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला. महत्वाचे म्हणजे, काँग्रेस नेते राहुल गांधी यांची मणिपूर ते गुजरात भारत जोडो न्याय यात्रा आसाममधून गेल्यानंतर या नेत्यांनी काँग्रेसला टा-टा बाय-बाय केला आहे. 

महिला नेत्यानं बोलून दाखवलं दुःख -द ह‍िंदूच्या एका वृत्तानुसार, आता काँग्रेसमध्ये महिला सुरक्षित नाहीत, म्हणून आपण राजकीय रंग बदलला आहे, असे काँग्रेस नेत्या गोगोई यांचे म्हणणे आहे. "माझे ब्लाउजही काँग्रेसमध्ये चर्चेचा विषय बनले होते. मी नाव घेऊ शकत नाही. पण एक काँग्रेस नेता म्हणाला की, मी भाजपामध्ये प्रवेश करणार, कारण माझ्या ब्लाउजवर कमळाचे फूल आहे. त्यामुळे, जो पक्ष महिलांचा सन्मान करू शकत नाही, अशा पक्षासोबत राहण्यात काहीही अर्थ नाही, असे गोगोई यांनी म्हटले आहे.  याच वेळी त्यांनी राज्यात होत असलेल्या विकास कामांसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचे कौतुकही केले.

राहुल गांधी यांच्या यात्रेचा मोठा प्रभाव पडला आहे -मंत्री पीयूष हजारिका यांनी काँग्रेसवर निशाणा साधत, 150 हून अधिक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याची माहिती दिली. त्यांनी रविवारी एक्सवर लिहिले की, 'मला हे मानावे लागेल की राहुल गांधी यांच्या भारत बस न्याय यात्रेने आसाममध्ये मोठा प्रभाव पाटला आहे. आसाम काँग्रेस आणि AASU च्या 150 हून अधिकन नेत्यांनी आज भाजपामध्ये प्रवेश  केला आहे. अंकिता दत्ता, बिस्मिता गोगोई आणि दीपांक कुमार नाथ यांनी चांगाला निर्णय घेतला आहे.'

लैंगिक छळाचा आरोप करणाऱ्या महिला नेत्यानेही काँग्रेस पक्ष सोडला -महत्वाचे म्हणजे,यूथ काँग्रेस आसामच्या माजी अध्यक्ष दत्ता यांनी गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बीव्ही श्रीनिवास यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता. यानंतर, एप्रिल 2023 मध्ये ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने (AICC) 'पक्षविरोधी कारवाई'चा ठपका ठेवत त्यांना 6 वर्षांसाठी निलंबित केले होते.  

टॅग्स :congressकाँग्रेसAssamआसामRahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राBJPभाजपा