बापरे! रुग्ण उपचारासाठी तडफडत होता अन् मच्छरदाणी लावून आराम करत होती महिला डॉक्टर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2022 19:55 IST2022-12-28T19:47:42+5:302022-12-28T19:55:14+5:30
रुग्ण वेदनेने तळमळत होता, तडफडत होता. पण त्याचवेळी रुग्णालयात महिला डॉक्टर मच्छरदाणी लावून आरामात झोपली होती.

बापरे! रुग्ण उपचारासाठी तडफडत होता अन् मच्छरदाणी लावून आराम करत होती महिला डॉक्टर
देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. अशीच एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना आता समोर आली आहे. बिहारमधील सर्वात मोठे रुग्णालय, श्री कृष्णा मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल म्हणजेच SKMCH चा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये महिला डॉक्टर मच्छरदाणी लावून आराम करत आहे, तर रुग्णाचे नातेवाईक उपचारासाठी विनवणी करत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे डॉक्टर रुग्णाचं अजिबात ऐकत नाही. त्याच्याकडे दुर्लक्ष करते.
मिळालेल्या माहितीनुसार, याआधी देखील एसकेएमसीएचमध्ये याच महिला डॉक्टरने खराब एसीमुळे रुग्णावर उपचार करण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला होता. त्यावेळीही महिला डॉक्टरचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा निष्काळजीपणाचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. उपचारासाठी एका व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
रुग्ण वेदनेने तळमळत होता, तडफडत होता. पण त्याचवेळी रुग्णालयात महिला डॉक्टर मच्छरदाणी लावून आरामात झोपली होती. व्हायरल व्हिडीओमध्ये हे दृश्य पाहायला मिळत आहे. व्हिडीओ समोर आल्यानंतर रुग्णालय व्यवस्थापनाने कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. SKMCH अधीक्षक डॉ. बी.एस. झा यांनी या व्हिडिओची तपासणी केल्यानंतर संबंधित महिला डॉक्टरवर कारवाई केली जाईल, असे सांगितले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"