शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

मुझफ्फरपूरमध्ये एईएस आजाराचे थैमान : नितीश कुमार यांच्याविरोधात जनहीत याचिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2019 22:31 IST

लहान मुलांसाठी यमदूत बनलेल्या एईएस आजाराला रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात उदासीनता दाखवल्याचा आरोप करत मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.

मुझफ्फरपूर - बिहारमधील मुझफ्फरपूर आणि आससापच्या परिसरात मेंदुज्वर (एईएस) या आजाराने थैमान घातले आहे. आतापर्यंत १०० हून अधिक मुलांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, लहान मुलांसाठी यमदूत बनलेल्या या आजाराला रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात उदासीनता दाखवल्याचा आरोप करत मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेमध्ये केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन, आरोग्य राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबै आणि बिहारचे आरोग्यमंत्री मंगल पांडेय यांचे नावही आहे. या प्रकरणाची सुनावणी २६ जून रोजी होणार आहे. दरम्यान, बिहारमधील मुजफ्फरपूरमध्ये मेंदूज्वरामुळे आतापर्यंत 108 मुलांचा मृत्यू झाला आहे. या आजाराने एवढे थैमान घातले असताना मुख्यमंत्री नितीश कुमार तब्बल 18 दिवसांनी भेट देण्यास पोहोचल्याने बाहेरील नागरिकांनी जोरदार विरोध केला. हॉस्पिटलमध्ये मेंदुज्वराने आजारी मुलांवर नीट उपचार करण्यात येत नाहीत. रोज मुलांचा मृत्यू होत आहे. नितीश कुमार यांना आता जाग आली आहे. त्यांनी परत जावे, अशी संतप्त प्रतिक्रिया रुग्णाच्या एका नातेवाईकाने दिली . नितीशकुमार 18 दिवस उलटले तरीही मुजफ्फरपूरच्या दौऱ्यावर न आल्याने यापूर्वी विरोधकांनीही त्यांना लक्ष्य केले होते. तसेच काळे झेंडे दाखवत चले जावचे नारे दिले गेले. मेंदू ज्वराने मुलांच्या मृत्यूचा आकडा वाढत आहे. परिस्थिती हाताबाहेर गेली तरीही मुख्यमंत्री नितीशकुमार न आल्याने त्यांच्यावर प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. यामुळे मुजफ्फरपूरमध्ये पोलिसांनी सुरक्षा वाढविली होती. यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना जास्त त्रास सहन करावा लागला. मुलांच्या एवढ्या मोठ्या प्रमाणावर मृत्यूमुळे देशभरात हाहाकार माजला आहे.  

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBiharबिहार