मुझफ्फरनगर दंगलीतील अल्पवयीन पीडितेवर सामूहिक बलात्कार
By Admin | Updated: January 30, 2016 14:16 IST2016-01-30T13:25:26+5:302016-01-30T14:16:16+5:30
उत्तरप्रदेशमधील मुझफ्फरनगरमध्ये तीन वर्षांपूर्वी झालेल्या दंगलीत सर्वस्व गमावल्यानंतर अंबेटा गावात विस्थापित झालेल्या एका अल्पवयीन बालिकेवर तीन तरूणांनी सामूहिक बलात्कार केला.

मुझफ्फरनगर दंगलीतील अल्पवयीन पीडितेवर सामूहिक बलात्कार
>ऑनलाइन लोकमत
मुझफ्परनगर, दि. ३० - उत्तरप्रदेशमधील मुझफ्फरनगरमध्ये तीन वर्षांपूर्वी झालेल्या दंगलीत सर्वस्व गमावल्यानंतर अंबेटा गावात विस्थापित झालेल्या एका अल्पवयीन बालिकेवर तीन तरूणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी तीन आरोपींवर कलम ३७६ (डी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिन्ही आरोपी सध्या फरास असून त्यातील एक तरूण माजी ग्राम प्रधानाचा मुलगा आहे.
पीडित मुलगी शुक्रवारी कामासाठी शेतात गेली होती, ती घरी येत असताना तिन्ही आरोपींनी तिला गाठून तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. बराच वेळ झाल्यानंतरही ती घरी न परतल्याने तिच्या कुटुंबियांनी तिचा शोध घेतला असता, ती त्यांना शेतात बेशुद्धावस्थेत पडलेली आढळली. सध्या तिची वैद्यकीय तपासणी सुरू आहे. याप्रकरणी पीडितेच्या कुटुंबियांनी निषेध नोंदवण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी त्यांना मारहाणही केली, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.