मस्ट- महत्वाचे दाऊद
By Admin | Updated: February 8, 2015 00:19 IST2015-02-08T00:19:25+5:302015-02-08T00:19:25+5:30
दाऊद इब्राहीम बॉलीवूडमध्ये पुन्हा सक्रीय

मस्ट- महत्वाचे दाऊद
द ऊद इब्राहीम बॉलीवूडमध्ये पुन्हा सक्रीयअवैध धंदे सुरूच : भावाच्या अटकेचा शून्य परिणाम डिप्पी वांकाणीमुंबई : सध्या रियल इस्टेट आणि ड्रग व्यवसायात सक्रीय असलेल्या कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहिम याने खंडणी, पायरसीबरोबरच बॉलीवूडमध्येही आपले पाय पुन्हा रोवायला सुरूवात केली असल्याचे वरिष्ठ पोलिस सूत्रांनी सांगितले. इब्राहीम कासकरच्या अटकेच्या त्याच्या या कारवायांवर कोणताच परिणाम होणार नसल्याचेही या सूत्रांनी सांगितले. इस्टेट एजंटकडे ३ लाखांची खंडणी मागितल्यानंतर त्याने केलेल्या तक्रारीवरून इब्राहीमला अटक झाली. हा प्रकार मालमत्तेच्या वादामुळे झाला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे, असे एका वरिष्ठ आयपीएस अधिकार्याने सांगितले. भारतात स्थानिक पातळीवर खंडणी वसूल करण्यात सक्रीय असलेल्या दाऊदचा विश्वसनीय साथीदार तारीक परवीन याला उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केल्यानंतर मात्र दाऊदवर परिणाम झाला होता, असे या अधिकार्याने सांगितले. दाऊद सुरवातीपासूनच खंडणी उकळण्याचे मार्ग म्हणून रीअल इस्टेट आणि बॉलीवूडला टार्गेट करत आला आहे. पायरसी हा तर खूप मोठा बिझनेस आहे. एका अधिकार्याने सांगितले की, दाऊद सध्या चित्रपटसृष्टीत किती सक्रीय आहे हे आत्ता तरी सांगता येणार नाही. मात्र त्याचे त्याच्या अखत्यारितील भागावर योग्य नियंत्रण आहे. पण असे असूनही त्या भागात रवी पुजारीसारख्यांविरोधात तक्रारी आहेत. छोटा शकील हा भारतात दाऊदसाठी काम करत आहे. त्यामुळे दाऊदवर सध्या कोणतीच तक्रार दाखल झालेली नाही. एका अधिकार्याच्या म्हणण्यानुसार, दाऊदचा भाऊ अनीस इब्राहीम दक्षिण आणि मध्य पूर्व आशियात रीअल इस्टेट आणि ड्रग्जचा कारभार सांभाळत आहे. मात्र दाऊदला मिडल इस्ट एशियात मुक्त प्रवेश मिळत असल्याने तेथे पाकिस्तानच्या आयएसआयकडून पैसे घेऊन तो व्यवसाय विस्तारण्याच्या प्रयत्नात आहे. ड्रग्जचा धंदा हा त्याचा भाऊ अनीसच सांभाळतो आणि सध्या दाऊदचे वास्तव्य कराचीतील क्लिफ्टन टाऊन येथे असल्याचे या अधिकार्याने सांगितले. .................................................................................