'मुस्लिमांचा वापर लग्नातल्या बँड बाजा पार्टीसारखा, समाजाला नेताच नाही'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 10:08 AM2021-09-27T10:08:06+5:302021-09-27T10:11:46+5:30

कानपूर येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना ओवेसी देशातील मुस्लीमांबद्दल खंत व्यक्त केली. देशातील मुस्लींमांची अवस्था लग्नातल्या बँड बाजा पार्टीसारखी झालीय, जिथं अगोदर त्यांना वाजंत्री वाजवायला सांगितली जाते.

'Muslims are used like wedding band baja party, they have no leader' asaduddin owaisee | 'मुस्लिमांचा वापर लग्नातल्या बँड बाजा पार्टीसारखा, समाजाला नेताच नाही'

'मुस्लिमांचा वापर लग्नातल्या बँड बाजा पार्टीसारखा, समाजाला नेताच नाही'

googlenewsNext
ठळक मुद्देउत्तर प्रदेशात 19 टक्के मुस्लीम समाज आहे. येथे प्रत्येक समाजाकडे नेता आहे, पण मुस्लीम समजाकडे नेता नाही, असेही औवेसी यांनी म्हटले. 

लखनौ - उत्तर प्रदेशमध्ये पुढील वर्षात विधानसभेच्या निवडणुका होत आहे. त्याअनुषंगाने आता सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. एमआयएमनेही उत्तर प्रदेशाकडे आपला मोर्चा वळवला आहे. त्यासाठी, सध्या उत्तर प्रदेशात एमआयएमचे प्रमुख खासदार असुदुद्दीन औवेसी यांचे दौरे वाढले आहे. रविवारी एका कार्यक्रमात बोलताना थेट मुस्लीमांना उद्देश भाषण केले. देशातील मुस्लीमांची अवस्था ही लग्नातल्या बँड बाजा पार्टीसारखी झाल्याचं ते म्हणाले.  

कानपूर येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना ओवेसी देशातील मुस्लीमांबद्दल खंत व्यक्त केली. देशातील मुस्लींमांची अवस्था लग्नातल्या बँड बाजा पार्टीसारखी झालीय, जिथं अगोदर त्यांना वाजंत्री वाजवायला सांगितली जाते. पण, नंतर बाहेरच उभा केलं जात. उत्तर प्रदेशात 19 टक्के मुस्लीम समाज आहे. येथे प्रत्येक समाजाकडे नेता आहे, पण मुस्लीम समजाकडे नेता नाही, असेही औवेसी यांनी म्हटले. 


औवेसी यांनी अयोध्येतून विधानसभा निवडणुकांच्या प्रचार मोहिमेला सुरुवात केली आहे. पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीत ४०३ जागांपैकी १०० ठिकाणी उमेदवार उभा करणार असल्याची घोषणाही त्यांनी केलीय. उत्तर प्रदेशात ८२ असे मतदारसंघ आहेत, जिथे मुस्लीम मतदारांची संख्या जास्त असून उमेदवारांचं भवितव्य ठरवू शकतात.

 

Web Title: 'Muslims are used like wedding band baja party, they have no leader' asaduddin owaisee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.