शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
3
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
4
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
5
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
6
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
7
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
8
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
9
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
10
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
11
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
12
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
13
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
14
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
15
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
16
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
17
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
18
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
19
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
20
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!

तेलंगणात मुस्लीम मते निर्णायक; टीआरएसला एमआयएमची साथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2018 05:27 IST

तेलंगणात निवडणुकीच्या रणधुमाळीत सगळ्याच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. तिथे ७ डिसेंबर रोजी मतदान होईल. तेलंगणात जातीधर्माचे राजकारण महत्त्वाचे असल्याचे प्रचारांमधून दिसत आहे.

- धनाजी कांबळे

हैदराबाद : तेलंगणात निवडणुकीच्या रणधुमाळीत सगळ्याच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. तिथे ७ डिसेंबर रोजी मतदान होईल. तेलंगणात जातीधर्माचे राजकारण महत्त्वाचे असल्याचे प्रचारांमधून दिसत आहे. विशेषत: मुस्लीम समाजाची मते या निवडणुकीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहेत.तेलंगणात १२.७ टक्के मुस्लीम समाज आहे. सर्वच मतदारसंघात त्यांचा प्रभाव आहे. मात्र, प्रामुख्याने अदिलाबाद, मेहबूबनगर, निजामाबाद, नालगोंडा, रंगारेड्डी, हैदराबाद, मेडक आणि करीमनगरमध्ये मुस्लिमांचे प्राबल्य आहे. गेल्या, २०१४ च्या निवडणुकीत तेलंगणाला स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्याचा मुद्दा होता. किंबहुना या मुद्यावर केसीआर यांनी निवडणुकीत विजयश्री मिळवली होती. मुस्लीम समाजानही केसीआर यांच्या टीआरएसलाच पाठिंबा दिला होता. विशेषत: उत्तर तेलंगणातील जनता केसीआर यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली होती.तज्ज्ञांच्या मते, लोकसभा-विधानसभा निवडणुका एकत्र होण्याच्या भीतीने केसीआर यांनी मुदतीआधीच विधानसभा बरखास्त केली. एकत्र निवडणुका झाल्यास राज्याच्या मुद्यांऐवजी राष्ट्रीय मुद्यांभोवतीच निवडणूक फिरेल, असे केसीआर यांना वाटत होते. त्यामुळेच त्यांनी मुदतीआधीच विधानसभा बरखास्त केली. भाजपाच्या समर्थन किंवा विरोधाचा मुद्दाच फार चर्चेत राहील आणि विधानसभेत मुस्लीम मते कुठे जातील, याची खात्री नसल्यानेच त्यांनी हे पाऊल उचलले, असे के. नागेश्वर म्हणाले.आॅल इंडिया मजलिस ए इत्तेहादूल मुस्लिमीन (एमआयएम) २०१४ पासून काँग्रेससोबत नाही. आता एमआयएम व टीआरएस यांचे चांगले संबंध आहेत. एमआयएमचा हैदराबादमधील ७ मतदारसंघात मोठा प्रभाव आहे. गेल्यावेळी एमआयएमने या मतदारसंघात वर्चस्व सिद्ध केले. या विभागात ४० टक्के मुस्लीम आहेत. त्यामुळे टीआरएस आणि एमआयएमच्या मैत्रीपूर्ण संबंधाचा फायदा येथे होत आला आहे. काँग्रेसकडे वळणारी मते टीआरएसकडे वळविण्याचा एमआयएमचा प्रयत्न असेल, असेही के. नागेश्वर म्हणतात.एमआयएमबरोबरच टीआरएस आणि भाजपची यांचीही मैत्री असल्याचे बोलले जाते. हे दोघे एकमेकांविरोधात भूमिका घेत आहेत. मात्र, मुस्लिमांची मते काँग्रेसला जाऊ नयेत, यासाठी असे दाखवले जात असल्याचे तज्ज्ञांना वाटते.याच चपलांनी मला माराकोरुटला मतदारसंघात अकुला हनुमंत या अपक्ष उमेदवाराकडे सर्वांचेच लक्ष वेधले गेले आहे. प्रचारासाठी घराघरात जाऊ न तो आपले माहितीपत्रक मतदारांना देताना सोबत तो चपलांचा (स्लिपर्स) जोडही प्रत्येक घरात देत आहे. मी दिलेली आश्वासने पूर्ण नाही केली, तर तुम्ही याच चपलांनी मला बडवा, असे तो सांगत आहे.

टॅग्स :Telangana Assembly Election 2018तेलंगणा विधानसभा निवडणूक 2018