शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाची टोपी घालण्यास नकार दिल्याने विद्यार्थिनीचा छळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 14:08 IST

उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये भाजपाची टोपी घालण्यास नकार दिल्याने एका मुस्लिम विद्यार्थिनीचा छळ करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

ठळक मुद्देउत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये भाजपाची टोपी घालण्यास नकार दिल्याने एका मुस्लिम विद्यार्थिनीचा छळ करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विद्यार्थिनीच्या महाविद्यालयातील दोन तरुणांनी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला आहे. महाविद्यालय प्रशासनाने याप्रकरणी दोन्ही विद्यार्थ्यांना महाविद्यालयातून काढून टाकले आहे. 

मेरठ - उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये भाजपाची टोपी घालण्यास नकार दिल्याने एका मुस्लिम विद्यार्थिनीचा छळ करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विद्यार्थिनीच्या महाविद्यालयातील दोन तरुणांनी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला आहे. याप्रकरणी महाविद्यालय प्रशासनाने या दोन्ही विद्यार्थ्यांना महाविद्यालयातून काढून टाकले आहे. 

विद्यार्थिनीने आपल्या सोबत घडलेला प्रकाराची ट्वीटरवरून माहिती दिली आहे. '2 एप्रिल रोजी महाविद्यालयाच्या सहलीसाठी मी आग्रा या ठिकाणी गेले होते. या सहलीला आलेल्या 55 विद्यार्थ्यांमध्ये मी एकमेव मुस्लिम विद्यार्थीनी होते. सोबत चार फॅकल्टी मेंबरही होते. त्यामध्ये दोन पुरुषांचा समावेश होता. या विद्यार्थ्यांनी दारू प्यायल्यानंतर मला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सोबत काही सामान आणलं होतं. त्यामध्ये भाजपाची टोपीही होती. टोपी घालण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला. मी त्यासाठी नकार दिल्याने त्यांनी मला त्रास द्यायला सुरुवात केली. मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. दोन फॅकल्टी मेंबरच्या समोरच हा प्रकार सुरू होता. पण त्यांनी त्याकडे साफ दुर्लक्ष केलं' असं या विद्यार्थिनीने म्हटलं आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महाविद्यालय प्रशासनाने याप्रकरणी दोन विद्यार्थ्यांना महाविद्यालयातून काढून टाकले आहे. महाविद्यालयाचे संचालक एस. एम. शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'ही घटना घडली तेव्हा त्या ठिकाणी चार वरिष्ठ प्राध्यापक उपस्थित होते. त्यांनी या घटनेची माहिती दिली नाही. मात्र या विद्यार्थिनीने तक्रार देताच आम्ही दोन्ही विद्यार्थ्यांना महाविद्यालयातून काढून टाकले आहे. आता हे प्रकरण महाविद्यालयातील अंतर्गत चौकशी समितीकडे दिले असून त्याचा तपास सुरू आहे.' तसेच विद्यार्थिनीने 'मी ट्वीटर जे लिहिलं आहे त्यावर ठाम आहे. पण सध्या हे प्रकरण चौकशी समितीकडे असल्याने त्यावर मी अधिक काहीही बोलणार नाही. या प्रकरणाचा योग्य तपास होईल असं मला वाटतं. माझ्याबाबतीत जे घडलं त्याविरोधात मी लढत आहे,' असं म्हटलं आहे. विद्यार्थिनीचं हे ट्वीट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाल्याने नेटिझन्स त्यावर तीव्र प्रतिक्रिया देत आहेत. 

 

टॅग्स :BJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेश