muslim rally in bhopal why only one community comes to set the country on fire again and again asks baba ramdev  | "नेहमी एकाच समाजाचे लोक आग का लावतात?;" भोपाळमधील मुस्लीम रॅलीवर बाबा रामदेव म्हणाले...

"नेहमी एकाच समाजाचे लोक आग का लावतात?;" भोपाळमधील मुस्लीम रॅलीवर बाबा रामदेव म्हणाले...

ठळक मुद्देभोपाळमधील इकबाल मैदानावर मुस्लीम समाजाने फ्रान्सविरोधात रॅली केली. भारताने फ्रान्सचे उघडपणे समर्थन केले आहे.रामदेव म्हणाले, धार्मिक उन्मादामुळेच जग भरात युद्धे होतात.

नवी दिल्ली - भोपाळमधील इकबाल मैदानावर मुस्लीम समाजाने फ्रान्सविरोधात रॅली केली. यामुळे देशातील एक मोठ्या वर्गाकडून संताप व्यक्त होत आहे. भारताने फ्रान्सचे उघडपणे समर्थन केले असताना, एक विशिष्ट समाज त्याला विरोध करून काय सांगू इच्छितो? असा सवाल लोक करत आहेत. यातच फ्रान्सच्या राष्ट्रपतींविरोधात भारतात एका विशिष्ट समाजाने केलेले निदर्शन अत्यंत दुर्दैवी असल्याचे, योग गुरू बाबा रामदेव यांनी म्हटले आहे. एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना, सरकारने अशा प्रकारच्या  कार्यक्रमांना परवानगी देणे योग्य नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

Nice Attack: मुंबईच्या रस्त्यावर फ्रान्स राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉनचे पोस्टर्स पायदळी तुडवले; रझा अकादमीचं कृत्य

'नेहमी-नेहमी एकच समाज का आग लावतो' - 
यावेळी बाबा रामदेव यांनी देशातील मुस्लिमांच्या वृत्तीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, 'नेहमी-नेहमी एकाच समाजाचे लोक का आग लावायला सुरुवात करतात? मग हिंदूही विचार करतील, की आगच लावावी. आपण आपल्या मान्यतांवर विश्वास ठेवा, मात्र, संपूर्ण जगावर तर हे थोपू शकत नाही. स्वतःप्रति दृढ रहा आणि इतरांप्रति उदार रहा. स्वधर्म निष्ठा, परधर्म सहिष्णुता ठेवा'. रामदेव म्हणाले, ध्रुवीकरणाचे घृणास्पद राजकारण संपायला हवे. यावर लगाम लागायला हवा.'

मुस्लिमांना फ्रान्सच्या लाखो नागरिकांना मारण्याचा पूर्ण अधिकार; मलेशियाचे माजी PM महातिर मोहम्मद यांचं प्रक्षोभक वक्तव्य

'धार्मिक उन्मादामुळेच युद्ध होतात' - 
रामदेव म्हणाले, धार्मिक उन्मादामुळेच जग भरात युद्धे होतात. 'आजवर जगभरात झालेल्या लढायांचे सर्वात मोठे कारण हे धार्मिक उन्माद आहे. धार्मिक दंगे आहेत.' यावेळी, पैगंबर मोहम्मद, यशू ख्रिस्त, गुरुनानक देव जी, भगवान महावीर, बुद्ध, भगवान राम, कृष्ण, शिव, कुठल्याही महापुरुषाने धार्मिक कट्टरतेसंदर्भात भाष्य केले आहे? असा सवाल करत, कधीच नाही,' असे बाबा रामदेव म्हणाले. या सर्वांनी एकच गोष्ट सांगितली आहे, 'सर्व मानुष्य एकसारखेच आहेत. हिंसा तर अत्यंत दूरची गोष्ट, हे म्हणतात, की कधीही कुणाचे मन दुखवू नका. मग हा काय तमाशा सुरू आहे? कशासाठी निदर्शन होत आहे?'

योग गुरू म्हणाले, एखाद्या व्यक्तीची मान कापली जाते, हत्या केली जाते. यासाठी, की आमच्या पुर्वजाचे कार्टून का तयार केले? त्यांनी प्रश्न उपस्थित केला, की 'एवढी असहिष्णुता का?' रामदेव म्हणाले, 'धर्माच्या नावावर हत्या करणे, लोकांचा शिरच्छेद करणे, लोकांची कत्तल करणे, हा धर्म नाही, अधर्म आहे, हे पाप आहे, हा गुन्हा आहे. हे जगाला युद्धाकडे ढकलणारे आहे.'

"वेदनादायक शिक्षा मिळेल..."; फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रॉन यांच्यासंदर्भात झाकीर नाईकने ओकली गरळ

'संपूर्ण जगात पसरवला जातोय विध्वंसक विचार' -
रामदेव म्हणाले, एक विद्धवंसक विचार संपूर्ण जगात पसरवला जात आहे. काही लोक म्हणतात, की इस्लामचा स्वीकार करा, अन्यथा मारून टाकू. काही लोक म्हणतात, की ख्रिश्चन व्हा, अन्यथा स्वर्ग मिळणार नाही. काही लोक म्हणतात, हिंदू धर्म स्वीकारा, अन्यथा मोक्ष मिळणार नाही. मग परत दुसरे-तिसरे आणखी येतात. रामदेव म्हणाले, 'लोक जोवर आपल्या धर्माला श्रेष्ठ आणि दुसऱ्याच्या धर्माला निकृष्ट म्हणत राहतील, तोवर जगात आग लागतच राहणार.'

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: muslim rally in bhopal why only one community comes to set the country on fire again and again asks baba ramdev 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.