मुस्लीम पर्सनल बोर्ड कोर्टात आव्हान देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 03:30 IST2025-04-03T03:26:20+5:302025-04-03T03:30:23+5:30

Navi Delhi News: वक्फ सुधारणा विधेयकाला ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड (एआयएमपीएलबी) ही मुस्लीम समुदायाची देशातील सर्वात मोठी संघटना न्यायालयात आव्हान देणार आहे. तसेच या काळ्या कायद्याच्या विरोधात रस्त्यावर उतरून लढा दिला जाईल असेही या संघटनेने जाहीर केले आहे. 

Muslim Personnel Board will challenge in court | मुस्लीम पर्सनल बोर्ड कोर्टात आव्हान देणार

मुस्लीम पर्सनल बोर्ड कोर्टात आव्हान देणार

 नवी दिल्ली - वक्फ सुधारणा विधेयकाला ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड (एआयएमपीएलबी) ही मुस्लीम समुदायाची देशातील सर्वात मोठी संघटना न्यायालयात आव्हान देणार आहे. तसेच या काळ्या कायद्याच्या विरोधात रस्त्यावर उतरून लढा दिला जाईल असेही या संघटनेने जाहीर केले आहे.

एआयएमपीएलबीचे सदस्य मोहम्मद अदीब यांनी सांगितले की, मुस्लिम समुदायाची मालमत्ता हडप करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. आम्ही ही चाल कधीही यशस्वी होऊ देणार नाही. वक्फ विधेयकाबाबतचा लढा आम्ही हरलो आहोत असे कोणीही समजू नये. आमच्या संघर्षाला आता सुरूवात झाली आहे. देश वाचविण्यासाठी आम्ही हा लढा देत आहोत. वक्फ सुधारणा कायदा हा भारताच्या एकात्मतेवर घाला आहे, असेही अदीब म्हणाले. 

उत्तर प्रदेशात कडक सुरक्षा व्यवस्था
वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत बुधवारी सादर झाल्याच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील अनेक शहरांतील संवेदनशील आणि अतिसंवेदनशील भागांत सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली. वरिष्ठ पोलिस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी ध्वजसंचलन केले. मुस्लीम संघटनांचा विधेयकाला विरोध आहे.  

विधेयक मागे घ्या; एम.के. स्टॅलिन यांची मागणी
वक्फ सुधारणा विधेयक मागे घ्यावे अशी मागणी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. प्रत्येक नागरिकाला त्याच्या धर्माचे पालन करण्याचा अधिकार राज्यघटनेने दिला आहे, असे स्टॅलिन यांनी म्हटले आहे.  

विधेयकाला विरोधच
ओडिशातील विरोधी पक्ष असलेल्या बिजू जनता दलाने (बिजद) लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयकालाच विरोध केला. आंध्र प्रदेशातील वायएसआरसीपी पक्षाचे नेते एम. गुरुमूर्ती यांनी सांगितले की, आमच्या पक्षाने लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयकाला विरोध दर्शविला आहे. माकपनेही विरोध केला आहे.

Web Title: Muslim Personnel Board will challenge in court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.