शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

मुरली मनोहर जोशींनी घेतली अडवाणींची भेट, सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत चर्चा? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 16:08 IST

लोकसभा निवडणूक लढवत नसलेले ज्येष्ठ भाजपा नेते मुरली मनोहर जोशी यांनी लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेतली

नवी दिल्ली - यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपल्या अनेक ज्येष्ठ नेत्यांना त्यांच्या वाढत्या वयाचा हवाला देऊन उमेदवारी नाकारली आहे. त्यामुळे पक्षस्थापनेपासून सक्रिय असलेले अनेक नेते नाराज झाले आहे. दरम्यान, यावेळी निवडणूक लढवत नसलेले ज्येष्ठ भाजपा नेते मुरली मनोहर जोशी यांनी लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेतली असून, दोन्ही नेत्यांमध्ये सध्याच्या  राजकीय परिस्थितीबाबत महत्त्वपूर्ण  चर्चा झाल्याचे वृत्त आहे. लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी या ज्येष्ठ नेत्यांना भाजपाने यावेळी उमेदवारी दिलेली नाही. उमेदवारी नाकारली गेल्यानंतर या नेत्यांना आपली नाराजी लपवता आलेली  नाही. लालकृष्ण अडवाणी यांनी गुरुवारी संध्याकाळी नेशन फर्स्ट, पार्टी नेक्स, सेल्फ लास्ट' असे शीर्षक असलेला एक ब्लॉग प्रकाशित करून पक्षातील नव्या नेतृत्वाला उपदेशाचे डोस पाजण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, मुरली मनोहर जोशी यांनी आज सकाळी लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही ज्येष्ठ नेत्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत चर्चा केली. दरम्यान, या चर्चेचा अधिक तपशील समोर येऊ शकलेला नाही. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBJPभाजपाLal Krishna Advaniलालकृष्ण अडवाणीPoliticsराजकारण