खुनी पित्याला जन्मठेपेऐवजी १४ वर्षांची शिक्षा
By Admin | Updated: May 30, 2014 02:09 IST2014-05-30T02:09:28+5:302014-05-30T02:09:28+5:30
सहलीला जाण्यासाठी पैसे मागणार्या मुलीच्या डोक्यात कु-हाड घालणार्या पित्याची जन्मठेपेची शिक्षा रद्द करून उच्च न्यायालयाने त्याला १४ वर्षांची शिक्षा ठोठावली़

खुनी पित्याला जन्मठेपेऐवजी १४ वर्षांची शिक्षा
मुंबई : सहलीला जाण्यासाठी पैसे मागणार्या मुलीच्या डोक्यात कुºहाड घालणार्या पित्याची जन्मठेपेची शिक्षा रद्द करून उच्च न्यायालयाने त्याला १४ वर्षांची शिक्षा ठोठावली़ गटा मोहनसिंग असे या आरोपीचे नाव आहे़ सिल्वासा येथे १९९६ मध्ये ही घटना घडली़ तेव्हापासून मोहनसिंग कारागृहातच आहे़ त्यामुळे १४ वर्षांची शिक्षा पूर्ण झाल्याने त्याच्या सुटकेचे आदेशही न्या़ विजया कापसे-ताहिलरमानी यांच्या खंडपीठाने दिले़ मोहनसिंगची मुलगी साधनाला सहलीला जायचे होते़ त्यासाठी तिने ३ डिसेंबर १९९६ रोजी मोहनसिंगकडे पैसे मागितले़ त्यास त्याने नकार दिला़ त्यावरून या दोघांमध्ये भांडण झाले व संतप्त झालेल्या मोहनसिंगने साधनाच्या डोक्यात कुºहाड घातली़ त्यात साधनाचा मृत्यू झाला़ याप्रकरणी मोहनसिंगवर खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला़ या हत्येसाठी दोषी धरत सत्र न्यायालयाने मोहनसिंगला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली़ याला मोहनसिंगने उच्च न्यायालयात आव्हान दिले व ही शिक्षा रद्द करण्याची मागणी केली होती.