उरणमध्ये विक्रेत्याच्या हत्येप्रकरणी मित्राला नागपुरातून अटक

By Admin | Updated: March 20, 2015 22:40 IST2015-03-20T22:40:14+5:302015-03-20T22:40:14+5:30

उरण : धुळवडीच्या पहाटे आनंदनगर - उरण येथील सुशांत गिरी (२२) या होलसेल विक्रेत्याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी त्याचाच जवळचा मित्र बेनू (उर्फ बिनोद) गोस्वामी (२४) याला नागपूरात सापळा रचून अटक केली. दारुच्या नशेतच आरोपीनी हत्या करुन त्याच पहाटे त्यांने पत्नी - मुलासह नागपूर येथे पलायन केल्याची माहिताही पोलिसांनी दिली.

In the murder of a seller in Uran, Mitra was arrested from Nagpur | उरणमध्ये विक्रेत्याच्या हत्येप्रकरणी मित्राला नागपुरातून अटक

उरणमध्ये विक्रेत्याच्या हत्येप्रकरणी मित्राला नागपुरातून अटक

ण : धुळवडीच्या पहाटे आनंदनगर - उरण येथील सुशांत गिरी (२२) या होलसेल विक्रेत्याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी त्याचाच जवळचा मित्र बेनू (उर्फ बिनोद) गोस्वामी (२४) याला नागपूरात सापळा रचून अटक केली. दारुच्या नशेतच आरोपीनी हत्या करुन त्याच पहाटे त्यांने पत्नी - मुलासह नागपूर येथे पलायन केल्याची माहिताही पोलिसांनी दिली.
उरण शहरातील आनंदनगरमधील महालक्ष्मी संकुलातील पहिल्या मजल्यावर सुशांत गिरी (२२) हा राहात होता.होळीच्या रात्री बेनू गोस्वामी आणि मित्र सुशांत दोघे मद्यपान करत असताना त्यांच्यात वाद झाला. यावेळी बेनूने केलेल्या मारहाणीत सुशांत बेशुध्द पडला. त्यानंतर बेनूने सुशांतचा गळा आवळला. उरण येथील नवीन शेवा येथे भाड्याच्या घरात पत्नी आणि अडीच वर्षाच्या मुलासह राहात होता. पेंटर म्हणून काम करणारा बेनू पान टपरीवरही काम करीत होता. हत्येनंतर वडिलांची तब्येत बिघडल्याची थाप मारीत तत्काळ निघायचे आहे सांगून त्यांनी पहाटे चार वाजताच उरणमधून पलायन करुन नागपूर गाठले. वेगवेगळ्या नावाने राहणा-या बेनूचा शोध घेताना पोलिसांना चांगलीच कसरत करावी लागली. अखेर आसाम त्रिपुराची मतदार यादीतून त्याच्या मूळ गावाचा पत्ता शोधून काढण्यात पोलिसांना यश आले. (वार्ताहर)

Web Title: In the murder of a seller in Uran, Mitra was arrested from Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.