पाच वर्षांत गुरगावात खून, बलात्काराचे सर्वाधिक गुन्हे; हरियाणा विधानसभेत माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2019 04:14 AM2019-08-07T04:14:42+5:302019-08-07T04:14:59+5:30

फरिदाबाद, सोनिपतही आघाडीवर; महिलांविरोधी गुन्ह्यांची संख्या वाढली

Murder in Gurgaon in five years, most rape crimes | पाच वर्षांत गुरगावात खून, बलात्काराचे सर्वाधिक गुन्हे; हरियाणा विधानसभेत माहिती

पाच वर्षांत गुरगावात खून, बलात्काराचे सर्वाधिक गुन्हे; हरियाणा विधानसभेत माहिती

Next

चंदीगड : गेल्या पाच वर्षांत हरियाणातील सर्व जिल्ह्यांच्या तुलनेत गुरगावमध्ये बलात्काराच्या सर्वाधिक ६६३ आणि खुनाच्या ४७० घटना घडल्या, अशी माहिती विधानसभेत देण्यात आली. काँग्रेसचे सदस्य करणसिंह दलाल यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राज्य सरकारने उपरोक्त माहिती दिली. याच कालावधीत फरिदाबादेत बलात्काराच्या ५४३ आणि खुनाच्या ३३७ घटनांची नोंद झाली. सोनिपत जिल्ह्यात बलात्काराच्या २२९ आणि खुनाच्या ४४८ घटनांची नोंद झाल्याची माहिती देण्यात आली.

हरियाणातील सर्व जिल्ह्यांच्या तुलनेत फरिदाबाद आणि गुरगावात बालकांवरील बलात्काराच्या अनुक्रमे ४१२ आणि ३५४ गुन्ह्यांची नोंद झाली. हे दोन जिल्हे महिलांविरोधी गुन्ह्यांच्या बाबतीतही आघाडीवर असून, गुरगाव जिल्ह्यात ४,५७७ आणि फरिदाबादेत ४,३१५ आणि पानिपत जिल्ह्यात ३,५९५ गुन्हे नोंदविण्यात आले. अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यातहत भिवानीमध्ये ३०३, फरिदाबादमध्ये २८५, हिसार जिल्ह्यात २८०, रोहतकमध्ये २४३, पालवलमध्ये २०८ आणि गुरगाव जिल्ह्यात १९० गुन्हे नोंदविण्यात आले. नोव्हेंबर २०१४ पासून आजपर्यंत खून, बलात्काराची माहिती आमदार दलाल यांनी मागितली होती. (वृत्तसंस्था)

नोव्हेंबर २०१४ पासून राज्यात खुनाच्या ५,९४३, बलात्काराच्या ४,८४७, पोस्कोतहत ३,६७४, महिलांविरोधी ४२,२६५ गुन्ह्यांची नोंद झाली, तसेच अ‍ॅट्रॉसिटीच्या ३,६९५ गुन्ह्यांची नोंद झाल्याची माहिती विधानसभेत देण्यात आली.
२० जुलै २०१९ पर्यंत खूनप्रकरणी ९५३ जणांना, बलात्काराच्या आरोपावरून २४९ जणांना आणि बालकांवरील बलात्कार प्रकरणात ४५७ जणांना दोषी ठरविण्यात आले, असे सरकारच्या वतीने सांगण्यात आले.

Web Title: Murder in Gurgaon in five years, most rape crimes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.