मुलाच्या संगोपनासाठी केली मुलीची हत्या

By Admin | Updated: September 18, 2014 10:41 IST2014-09-18T08:58:33+5:302014-09-18T10:41:04+5:30

आजारी मुलाची काळजी घेता यावी, त्याचे संगोपन करता यावे म्हणून एका महिलेने आपल्या सहा महिन्याच्या मुलीची हत्या केल्याची घटना धक्कादायक घडली आहे.

The murder of the child for the raising of a child | मुलाच्या संगोपनासाठी केली मुलीची हत्या

मुलाच्या संगोपनासाठी केली मुलीची हत्या

>ऑनलाइन लोकमत
जबलपूर, दि. १८ -  आजारी मुलाची काळजी घेता यावी, त्याचे संगोपन करता यावे म्हणून एका महिलेने आपल्या सहा महिन्याच्या मुलीची हत्या केल्याची घटना धक्कादायक घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी रितू (वय २७ ) हिला अटक केली असून सहा महिन्याच्या आरोहीला ठार मारून तिचा मृतदेह मंदिराजवळ टाकून दिल्याचे तिने कबूल केले आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रितूने ७ सप्टेंबर रोजी आपल्या मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार नोंदवली होती. याप्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी सीसीटीव्ही रेकॉर्डिंगही तपासले असता त्याता रितू आरोहीला एका बॅगमध्ये ठेवून स्कूटरवरून बाहेर जाताना दिसत होती. मात्र ती परत आल्यावर तिच्या हातात ती बॅग नव्हती. 
हे पाहिल्यानंतर पोलिसांनी रितूला चौकशीस बोलावले. पोलिसी खाक्या दाखवताच तिने तिचा गुन्हा कबूल केला. आपल्या साडेतीन वर्षाचा मुलगा आजारी असतो, मात्र आरोहीमुळे आपल्यायाला त्याची नीट काळजी घेता येत नव्हती, त्याचे संगोपन करता ये नव्हते, म्हणून आपणच आरोहीचा खून केल्याचे तिने सांगितले. 
ज्या मंदिरावजवळ रितूने आरोहीला टाकले तेथून पोलिसांनी एक लहान मुलीचा सांगाडा ताब्यात घेतला असून तो डीएनए टेस्टसाठी पाठवण्यात आला आहे. 

Web Title: The murder of the child for the raising of a child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.