दरोडेखोरांकडून बँकेच्या सुरक्षा रक्षकाची हत्या

By Admin | Updated: August 25, 2014 23:35 IST2014-08-25T23:35:03+5:302014-08-25T23:35:03+5:30

एचडीएफसी बँकेच्या एटीएममध्ये टाकण्यासाठी आणलेली १४ लाख रुपयांची रक्कम सुरक्षा रक्षकाने आपले प्राण देऊन वाचविली़

The murder of the bank's security guard by the dacoits | दरोडेखोरांकडून बँकेच्या सुरक्षा रक्षकाची हत्या

दरोडेखोरांकडून बँकेच्या सुरक्षा रक्षकाची हत्या

छपरा : एचडीएफसी बँकेच्या एटीएममध्ये टाकण्यासाठी आणलेली १४ लाख रुपयांची रक्कम सुरक्षा रक्षकाने आपले प्राण देऊन वाचविली़
बिहारच्या सारण जिल्ह्याच्या नगर पोलीस ठाण्याअंतर्गत ही घटना घडली़ कॅश व्हॅन लुटण्यासाठी आलेल्या दरोडेखोरांनी प्रतिकार करणाऱ्या सुरक्षा रक्षकाची गोळ्या झाडून हत्या केली़
दोन मोटरसायकलवरून तीन दरोडेखोर आले आणि त्यांनी व्हॅन लुटण्याचा प्रयत्न केला़ मात्र व्हॅनच्या सुरक्षेसाठी तैनात सुरक्षारक्षक शाहरम मियां याने निकराने दरोडेखोरांचा प्रतिकार केला़ हा प्रतिकार पाहून दरोडेखोरांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या आणि क्षणात पसार झाले़ जखमी सुरक्षारक्षकाला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले़ या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: The murder of the bank's security guard by the dacoits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.