ऑनलाइन प्रवेशाला पालिकेचा हरताळ शिक्षण मंडळ : खासगी शाळांमध्ये प्रवेश देणार

By Admin | Updated: May 5, 2014 23:08 IST2014-05-05T22:55:15+5:302014-05-05T23:08:22+5:30

नाशिक : खासगी प्राथमिक शाळेत दुर्बल आणि वंचित घटकातील पात्र मुलांना प्रवेश देण्यासाठी शाळा आणि पालिका शिक्षण मंडळ यांनी ऑनलाइन प्रक्रिया राबविण्याचे आदेश होते; परंतु पालिकेने पूर्वतयारीच न केल्याने आता ऑनलाइन प्रवेश न करता पारंपरिक पद्धतीने प्रवेश दिला जात आहे.

Municipal corporation's online training session: Access to private schools | ऑनलाइन प्रवेशाला पालिकेचा हरताळ शिक्षण मंडळ : खासगी शाळांमध्ये प्रवेश देणार

ऑनलाइन प्रवेशाला पालिकेचा हरताळ शिक्षण मंडळ : खासगी शाळांमध्ये प्रवेश देणार

नाशिक : खासगी प्राथमिक शाळेत दुर्बल आणि वंचित घटकातील पात्र मुलांना प्रवेश देण्यासाठी शाळा आणि पालिका शिक्षण मंडळ यांनी ऑनलाइन प्रक्रिया राबविण्याचे आदेश होते; परंतु पालिकेने पूर्वतयारीच न केल्याने आता ऑनलाइन प्रवेश न करता पारंपरिक पद्धतीने प्रवेश दिला जात आहे.
खासगी प्राथमिक शाळेत प्रवेश देताना दुर्बल आणि वंचित मुलांना प्रवेश मिळत नाही. शिक्षण हक्क कायद्यानुसार या मुलांनादेखील चांगल्या शाळेत प्रवेश मिळावा यासाठी शासनाने खासगी शाळांना २५ टक्के राखीव कोटा ठेवला आहे. पालकांच्या निवासस्थानापासून एक ते तीन किलोमीटरदरम्यान असलेल्या शाळांमध्ये पाल्याच्या प्रवेशासाठी अर्ज करता येतो. जमा होणार्‍या अर्जांमधून लॉटरी पद्धतीने मुलांची निवड केली जाते. यावर्षीपासून योग्य ती काळजी घेण्यासाठी पालिका शिक्षण मंडळाने कार्यवाही सुरू केली आहे. त्यासाठी सर्व शाळांना प्रवेशाचे वेळापत्रक देण्यात आले आहे. सध्या प्राप्त अर्जांच्या छाननीची कार्यवाही सुरू आहे. त्यानंतर सोडत प्रक्रिया राबविली जाणार आहे.
ही सर्व कार्यवाही पारदर्शक पद्धतीने करण्यासाठी ऑनलाइन प्रक्रिया राबविण्याचे राज्य शासनाचे आदेश होते. त्यानुसार अर्ज दाखल करण्यापूर्वीच कोणत्या शाळेत किती जागा रिक्त आहेत याची माहिती ऑनलाइन मिळणार होती. त्यासाठी शिक्षण मंडळाने खास सॉफ्टवेअर विकसित करून सर्व शाळा जोडण्याची कार्यवाही करणे आवश्यक होते. परंतु तसे झाले नाही. पालिकेच्या शिक्षण मंडळाने कोणतीही पूर्वतयारीच केली नसल्याचे नूतन प्रशासनाधिकारी किरण कुंवर यांना आढळले आहे. त्यामुळे यंदा खासगी शाळेत प्रवेश देण्याची कार्यवाही पारंपरिक पद्धतीनेच होणार आहे.
..इन्फो..
देखरेखीखाली होणार प्रक्रिया
ऑनलाइन प्रवेशासाठी पालिकेने तयारी केली नाही. परंतु आता शाळांकडे अर्ज दाखल झाल्यानंतर सोडत काढण्याची प्रक्रिया पारदर्शकपणे व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांच्या परवानगीनुसार शिक्षण विस्तार अधिकार्‍यांच्या देखरेखीखाली सोडतप्रक्रिया पार पाडावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे शिक्षण मंडळाच्या प्रशासनाधिकारी किरण कुंवर यांनी सांगितले.

Web Title: Municipal corporation's online training session: Access to private schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.