उत्कृष्ट स्पर्धा आयोजनासाठी महापालिकेचे कौतुक
By Admin | Updated: July 18, 2015 01:12 IST2015-07-18T01:12:31+5:302015-07-18T01:12:31+5:30
पुणे : महापालिकेच्या वतीने महापौर चषक स्पर्धे अंतर्गत घेण्यात आलेल्या राज्य अजिंक्यपद निवड् चाचणी स्पर्धेच्या उत्कृष्ट संयोजनासाठी महाराष्ट्र राज्य कब्बडी संघटनेच्या वतीने पुणे महापालिकेस उत्कृष्ट स्पर्धा आयोजन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. जालना जिल्हयातील बदलापूर येथे कब्बडी दिना निमित्ताने बुधवारी ( दि. 15) रोजी झालेल्या एका कार्यक्रमात देण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी.ए चोपडे यांच्या हस्ते क्रीडा समिती अध्यक्ष महेंद्र पठारे, आणि माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबूराव चांदेरे यांनी हा पुरस्कार स्विकारला. मागील वर्षी धनकवडी येथे ही स्पर्धा घेण्यात आली होती. त्यासाठी राज्यभरातील कब्बडी संघानी उपस्थिती लावली होती. या स्पर्धेच्या आयोजनासाठी हे पारितोषीक देण्यात आले आहे. दरम्यान , शनिवारी झालेल्या मुख्यसभेत या पुरस्

उत्कृष्ट स्पर्धा आयोजनासाठी महापालिकेचे कौतुक
प णे : महापालिकेच्या वतीने महापौर चषक स्पर्धे अंतर्गत घेण्यात आलेल्या राज्य अजिंक्यपद निवड् चाचणी स्पर्धेच्या उत्कृष्ट संयोजनासाठी महाराष्ट्र राज्य कब्बडी संघटनेच्या वतीने पुणे महापालिकेस उत्कृष्ट स्पर्धा आयोजन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. जालना जिल्हयातील बदलापूर येथे कब्बडी दिना निमित्ताने बुधवारी ( दि. 15) रोजी झालेल्या एका कार्यक्रमात देण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी.ए चोपडे यांच्या हस्ते क्रीडा समिती अध्यक्ष महेंद्र पठारे, आणि माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबूराव चांदेरे यांनी हा पुरस्कार स्विकारला. मागील वर्षी धनकवडी येथे ही स्पर्धा घेण्यात आली होती. त्यासाठी राज्यभरातील कब्बडी संघानी उपस्थिती लावली होती. या स्पर्धेच्या आयोजनासाठी हे पारितोषीक देण्यात आले आहे. दरम्यान , शनिवारी झालेल्या मुख्यसभेत या पुरस्काराचे स्मृतीचिन्ह महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्याहस्ते महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांना देण्यात आले. सभागृह नेते बंडू केमसे, स्थायी समिती अध्यक्षा अश्विनी कदम, भाजपचे गटनेते गणेश बिडकर, सेनेचे गटनेते अशोक हरणावळ, रिपईचे गटनेते डॉ. सिध्दार्थ धेंडे यावेळी उपस्थित होते.==============================