मुंडेचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यामुळे झाला नाही - एम्स
By Admin | Updated: June 4, 2014 20:13 IST2014-06-04T20:06:13+5:302014-06-04T20:13:57+5:30
केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यामुळे झाला नसल्याची माहती 'एम्स' रुग्णालयातर्फे देण्यात आली आहे
मुंडेचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यामुळे झाला नाही - एम्स
ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. ४ - केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यामुळे झाला नसल्याचे 'एम्स' रुग्णालयातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. अपघातानंतर झालेल्या काही अंतर्गत दुखापतींमुळे मुंडेचा मृत्यू झाल्याचे 'एम्स'चे डॉक्टर अमित गुप्ता यांनी सांगितले. अपघातानंतर हृदय विकाराचा झटका बसल्याने मुंडेंचे निधन झाले अशी प्राथमिक माहिती आत्तापर्यंत रुग्णालयातर्फे देण्यात येत होती. मात्र आता आलेल्या शवविच्छेदन अहवालानुसार, अंतर्गत दुखापती हे मुंडेंच्या मृत्यूचे कारण आहे.
'एम्स'चे डॉक्टर अमित गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातामुळे मुंडेंना अंतर्गत गंभीर जखमा झाल्याने त्यांच्या शरीरात मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. तसेच त्यांच्या यकृतालाही जबर धक्का बसला होता. या दोन्हींचा त्यांच्या शरीरावर मोठा प्रहार झाला व त्यातच त्यांचा मृत्यू झाला, असे डॉ.गुप्ता यांनी सांगितले. अंतर्गत रक्तस्त्रावामुळेच मुंडेचा मृत्यू झाल्याचे ते म्हणाले.
मंगळवार ३ जून रोजी गोपीनाथ मुंडे यांच्या गाडीला नवी दिल्लीत अपघात झाला व त्यातच त्यांचे निधन झाले.