शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
2
खासदारांच्या दिलदार शुत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
3
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
4
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
5
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
6
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
7
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
8
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
9
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
10
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
11
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
12
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
13
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
14
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
15
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
16
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
17
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
18
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
19
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
20
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 

मुंबईचे पाणी देशात सर्वाधिक शुद्ध; दिल्लीत हवाच नव्हे, पिण्याचे पाणीही अशुद्ध

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2019 4:31 AM

दिल्लीची हवाच नव्हे, तर पाणीही अशुद्ध असल्याची माहिती दावा केंद्रीय ग्राहक, अन्न व सार्वजनिक वितरणमंत्री रामविलास पासवान यांनी दिली.

- एस. के. गुप्तानवी दिल्ली : दिल्लीची हवाच नव्हे, तर पाणीही अशुद्ध असल्याची माहिती दावा केंद्रीय ग्राहक, अन्न व सार्वजनिक वितरणमंत्री रामविलास पासवान यांनी शनिवारी दिली. भारतीय मानक ब्युरोने (बीआयएस) २० राज्यांच्या राजधान्यांच्या केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे त्यांनी हे सांगितले.मुंबईत नळाद्वारे पुरविण्यात येणाऱ्या पाण्याच्या नमुन्यांत दोष नसल्याचे आढळून आले आहे. २१ मोठ्या शहरांतील पाण्याच्या शुद्धतेत मुंबई पहिल्या स्थानी आहे. मुंबईतील पाण्याचे सर्व दहा नमुने तपासणीत उत्तीर्ण झाले आहेत. चंदीगडमधील पाण्यात अ‍ॅल्युमिनियम आणि क्लोरीनचे प्रमाण जास्त असल्याचे आढळून आले. पासवान म्हणाले की, २१ शहरांतील पाण्याचे १० नमुने तपासणीस पाठवले होते. त्यात दिल्लीचे सर्व नमुने ४२ पैकी १९ मानकांवर नापास झाले. दिल्लीच्या पाण्यात आर्सेनिक, क्लोराईड, टीडीएस, रंग, अमोनिया, सल्फाईड, अ‍ॅनियोनिक डिटर्जंट, लीड, मॅग्नेशियम, कॅल्शिअम नायट्रेट, अ‍ॅल्युमिनियम यांचे प्रमाण अधिक आढळून आले. महाराष्ट्रात अमरावती जिल्हा सहाव्या स्थानी असून, तेथील १० पैकी ६ नमुने नापास झाले. त्यांच्यात ७ मानकांत दोष आढळून आले. पासवान म्हणाले की, आमचा उद्देश कोणत्याही सरकारला दोष देणे हा नाही, हे दिल्ली सरकारला दाखवून देण्यासाठी देशभर सर्वेक्षण केले. २०२४ पर्यंत प्रत्येक घराला नळाचे स्वच्छ पाणी देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. १०० स्मार्ट शहरांतही पाण्याची तपासणी केली जात आहे.पाणीशुद्धतेत शहरांचे मानांकन१ मुंबई । २ हैदराबाद । ३ भुवनेश्वर । ४ रांची । ५ रायपूर६ अमरावती । ७ सिमला । ८ चंदीगड । ९ तिरुवनंतपूरम१० पाटणा । ११ भोपाळ । १२ गुवाहाटी । १३ बंगळुरू१४ गांधीनगर । १५ लखनौ । १६ जम्मू । १७ जयपूर१८ देहरादून । १९ चेन्नई । २० कोलकता । २१ दिल्ली