शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता: 'तो' बलात्कार होता तर आरोपीच्या अंगावर 'लव्ह बाईट्स' कसे? वकिलाचा धक्कादायक सवाल
2
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
3
३ कोटी २० लाख सरकारी निधी हडपण्याचा डाव उघड; आमदार प्रसाद लाड यांचा खळबळजनक आरोप
4
'धनुष्य बाण' कुणाचा, उद्धवसेना की शिंदेसेना? १६ जुलैला 'सुप्रीम' सुनावणी
5
अवघी दिल्ली एवढी लोकसंख्या, तरीही भारताच्या दृष्टीने 'घाना' देश महत्त्वाचा! कारण तरी काय?
6
सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीची चमकही झाली कमी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवी किंमत
7
पवार काका-पुतण्यांना दे धक्का; NCP च्या दोन्ही गटातील दिग्गज नेत्यांचा भाजपामध्ये प्रवेश
8
Apoorva Mukhija : "मी सिंगल आहे, मला आता लग्न करायचंय; बॉयफ्रेंड शोधतेय, प्लीज कोणीतरी..."
9
Viral Video : हत्तीचं पिल्लू इवल्याशा बेडकाला घाबरलं; क्यूटनेस व्हिडीओनं नेटकऱ्यांचं मन जिंकलं!
10
जे कुणाला जमलं नाही ते टीम इंडियानं करून दाखवलं; इंग्लंडच्या मैदानात रचला इतिहास
11
कशापाई तू वारी हट्ट केलास रे बाळा.. आता मी घरी एकटीच जाऊ का; गोविंदासाठी आजीने फोडला हंबरडा
12
Chanakyaniti: चाणक्यनीतीनुसार तरुणपणी केलेल्या 'या' तीन चुका म्हातारपणी भोवतात!
13
IND W vs ENG: स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा टी२० क्रिकेटमधील सुपरहिट जोडी, रचला नवा इतिहास!
14
'एक दिवसाचा पंतप्रधान'! आशिया खंडातील देशात उद्भवला बाका प्रसंग, 'नायक' सिनेमा आठवेल...
15
नाशिकमध्ये पतीविरोधात बलात्काराचा गुन्हा, पत्नीने बाळाला जन्म दिल्यानंतर समोर आले प्रकरण
16
"पप्पा, मला पावसात खेळायचंय"; १० वर्षांच्या लेकाचा हट्ट अन् हैवान झाला बाप, घेतला जीव
17
"सर्वाधिक पोलीसमृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने"; विरोधी पक्षनेते दानवेंनी मांडली आकडेवारी
18
'मीच मुख्यमंत्री राहणार', सिद्धारमय्या यांची स्पष्टोक्ती; डीके शिवकुमार म्हणाले...
19
स्वप्नांना पंख मिळाले! कठोर परिश्रमाने घातली आकाशाला गवसणी; आता नौदलात होणार अधिकारी
20
भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा राहतात प्रसिद्धीपासून दूर, ते सध्या आहेत कुठे? करतात काय? जाणून घ्या

मुंबई महापालिका स्वबळावर की आघाडीद्वारे: काँग्रेसचा निर्णय ७ जुलैला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 09:45 IST

या राज्यातील वरिष्ठ काँग्रेस नेत्यांसोबतच्या बैठकीनंतर त्यांनी हे वक्तव्य केले.

चंद्रशेखर बर्वे

नवी दिल्ली : मुंबई महापालिका निवडणुकीत स्वबळावर की आघाडी करून निवडणूक लढवायची, याचा अंतिम निर्णय काँग्रेस पक्ष येत्या ७ जुलै रोजी घेणार असल्याची घोषणा त्या पक्षाचे महाराष्ट्रासाठीचे प्रभारी व पक्ष सरचिटणीस रमेश चेन्नीथला यांनी सोमवारी केली. या राज्यातील वरिष्ठ काँग्रेस नेत्यांसोबतच्या बैठकीनंतर त्यांनी हे वक्तव्य केले.

या बैठकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राज्यसभा खासदार रजनी पाटील, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह इतर वरिष्ठ नेते उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन चर्चेची तपशीलवार माहिती दिली. चेन्नीथला यांनी सांगितले की, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस मुख्यालयात ही महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. यात काँग्रेसच्या भविष्यातील रणनीतीवर, तसेच पक्ष संघटना मजबूत करण्याबाबत चर्चा झाली. त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रात पक्ष संघटन बळकट करण्यासाठी प्रत्येक महिन्याला अशा प्रकारच्या बैठकीचे आयोजन करण्यात येईल. यामध्ये राज्यातील वरिष्ठ नेते सहभागी होऊन महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करतील. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत काँग्रेस नेत्यांनी सोमवारी बैठकीत आपले विचार मांडले. मागील विधानसभा निवडणुकीत बनावट मतदान झाल्याचा दावाही या नेत्यांनी केला.

चेन्नीथला यांनी म्हणाले की,  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची राजकीय व्यवहार समिती ७ जुलै रोजी मुंबईत बैठक घेणार असून, त्यात मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर की आघाडी करून लढवायची यावर अंतिम निर्णय घेतला जाईल. लवकरच एक ‘चिंतन शिबिर’ही घेतले जाईल.

‘राज ठाकरे यांची उत्तर भारतीयांविरोधातील भूमिका चुकीची’

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांविरोधात भूमिका मांडली होती, अशी आठवण करून देताच रमेश चेन्नीथला म्हणाले की, उत्तर भारतीयांना मुंबईतून हाकलण्याच्या राज ठाकरेंच्या वक्तव्याशी काँग्रेस सहमत नाही. राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, काँग्रेसची महाराष्ट्राबाबतची बैठक  संध्याकाळी ४ वाजेपर्यंत चालली. त्यात विविध नेत्यांनी निवडणुकांबाबत विचार मांडले.

टॅग्स :congressकाँग्रेसElectionनिवडणूक 2024