मुंबई-गोवा महामार्ग जूनपूर्वी पूर्ण करणार; केंद्रीय रस्तेवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 14:22 IST2025-01-08T14:20:51+5:302025-01-08T14:22:29+5:30
दिल्ली- मुंबई या महत्त्वाकांक्षी महामार्गचे काम या वर्षात पूर्ण होईल, असेही गडकरी यांनी सांगितले

मुंबई-गोवा महामार्ग जूनपूर्वी पूर्ण करणार; केंद्रीय रस्तेवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची ग्वाही
चंद्रशेखर बर्वे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: मुंबई-गोवा महामार्गवरील परिस्थितीमुळे मला रोज प्रवाशांची नाराजी सहन करावी लागते. ही नाराजी वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून समजते. यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी या महामार्गचे काम पूर्ण करू, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली. याशिवाय दिल्ली- मुंबई या महत्त्वाकांक्षी महामार्गचे काम या वर्षात पूर्ण होईल, असेही गडकरी यांनी सांगितले.
केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशाच्या वाहतूक मंत्र्याची ४२ वी बैठक भारत मंडपम येथे पार पडली. यावेळी पत्रकारांशी बोलताना गडकरी यांनी अपघातांत मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या वाढत्या संख्येवर खंत व्यक्त केली. सरकारने कॅशलेस उपचारांची व्यवस्था केली गेली आहे. अपघातात जखमी व्यक्तीचा ७ दिवस उपचार किंवा १.५ लाखांचा खर्च मंत्रालय करणार आहे, असे त्यांनी सांगितले.
१२५० नवीन प्रशिक्षण केंद्रे
मंत्रालयाने जाहीर केलेल्या ड्रायव्हिंग प्रशिक्षण धोरणांतर्गत देशात १२५० नवीन प्रशिक्षण आणि फिटनेस केंद्र उघडले जाणार आहेत. त्यासाठी साडेचार हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. सुमारे २५ लाख नवीन चालक तयार होतील. या केंद्रांमधून सुमारे १५ लाख लोकांना रोजगार मिळेल. या सर्व केंद्रावर सौर यंत्रणा बसविली जाणार आहे.
चालकांसाठीही आठ तासच ड्युटी
- जयपूरमध्ये झालेल्या अपघाताचा उल्लेख करीत गडकरी म्हणाले की, या अपघातातील चालक सकाळी साडेचार वाजल्यापासून संध्याकाळी ९.३० पर्यंत गाडी चालवित होता.
- आता चालक आठ तासापेक्षा जास्त काळ गाडी चालविणार नाही असा नियम बनविला जात आहे. त्यासाठी चालक गाडी चालवण्यासाठी बसेल तेव्हा कार्ड स्वॅपिंग होईल आणि इंजिन ८ तासांनंतर थांबेल.
हेल्मेट अनिवार्य
- सरकारने बेशिस्त कमी करण्यासाठी दंड वाढविला. मात्र दंडामुळे न्यायालयात जावे लागते. यामुळे पॅनल्टी लावावी अशी सूचना केली आहे.
- चारचाकी वाहनांमध्ये मागील बेल्ट आणि दुचाकीसाठी सहप्रवाशाला हेल्मेटला अनिवार्य केले चंद्रशेखर बर्वे आहे, असेही गडकरी म्हणाले.